कोपरगावचे नाव देशात चमकणाऱ्या विवेक कोल्हेवर अभिनंदनाचा वर्षाव

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : कोपरगाव तालुका हा सहकाराची पंढरी असुन या तालुक्यातील स्व. शंकरराव कोल्हे, स्व शंकरराव काळे या बड्या नेत्यांनी सहकार रूजवला आणि वाढवलाही पण माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा वारसा पुढे चावणारे युवा नेते तथा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या टाकाऊ मळी व पाण्यापासुन थेट सी एन जी तसेच पोटॅश खत निर्मिती करुन कोल्हे सहकारी कारखाना हा देशातला पहीला सहकारी कारखाना असल्याचा नवा विक्रम केला.

देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी विवेक कोल्हे यांच्या ऐतिहासिक कार्याचे भरभरून कौतुक केले. विवेक कोल्हे यांनी सहकारी साखर कारखानदारीत नव्या ऐतिहासिक प्रकल्पाची उभारणी करून कोपरगावचे  नाव देशभरात गाजवले आहे. विवेक कोल्हे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेवून कोपरगांवच्या विविध संघटना तसेच विविध क्षेञातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोपरगावची  बाजारपेठ फुलावी येथील व्यापारी व ग्राहकांच्या भल्यासाठी कार्य करणारे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे तसेच कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन, युवा आघाडी यांच्यावतीने विवेक कोल्हे यांचा विशेष सत्कार करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून , देशातील पहिला सहकारी कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सी.एन.जी) प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्प सुरू करुन सहकारात वेगळी क्रांती केली आहे असे म्हणत कोल्हे यांच्या कार्यकर्तृत्वाने भारावलेल्यांनी विवेक कोल्हे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या.

सत्कार सोहळा प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, व्यापारी महासंघाचे सचिव सुधीर डागा, प्रसिद्ध उद्योजक संजय भन्साळी, तुलशिदास खुबानी, नारायण अग्रवाल, केशवराव भवर, बबलू वाणी, संदीप  काबरा, रमेश शिरोडे, राजेंद्र बंब, आशुतोष पटवर्धन,  प्रमोद मुंदडा, उल्हास गवारे, प्रदीप साखरे, नारायण लांडगे आदी उपस्थित होते.

दरम्यान  बांधकाम व्यावसायिकांची संघटना अर्थात क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष राजेश ठोळे, प्रसिद्ध बांधकाम व्यवसायीक  व क्राडाईचे संघटनेचे प्रमुख प्रसाद नाईक यांच्यावतीने विवेक कोल्हे यांचा विशेष सत्कार करुन कोल्हे यांच्या कार्याबद्दल गुणगौरव करीत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.  यावेळी  बांधकाम व्यवसायिक  प्रसाद नाईक, राजेश ठोळे, हिरेन पापडेजा, मनिष फुलफगर, यश विसपुते, मनोज अग्रवाल, राहुल भारती, पराग संधान, सिध्देश  कपिले, सचिन बोरावके, विक्रांत सोनवणेसह क्रेडाई संघटनेचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सत्काराला उत्तर देताना विवेक कोल्हे म्हणाले की, मी सर्व मान्यवर मित्रपरिवार यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून देशातील पहिला सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CNG) प्रकल्प तसेच स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्प सुरू करण्याचं भाग्य मला लाभलं. हा संजीवनी परिवाराचा, आपल्या कोपरगावच्या सहकार्यांचा आणि इथल्या प्रत्येक शेतकऱ्याचा विजय आहे.

आपल्या आशीर्वादानेच आपण आज नव्या सहकार युगाची सुरुवात करू शकलो आहोत. आपण दाखवलेला सन्मान आणि विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. हा सन्मान म्हणजे पुढील वाटचालीसाठी जबाबदारी आहे.  नव्या कल्पना, नव्या संधी आणि नव्या सहकाराचा पाया घालण्याची, मला दिलेलं बळ आहे. आपल्या सर्वांचे  मनापासून आभार आहे असे म्हणत कोल्हे यांनी सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply