कोपरगाव मध्येच कर्करोगावर सप्ततारांकीत मोफत उपचार  – डॉ. संदीप मुरुमकर 

 कोपरगाव प्रतिनिधी दि. १६ : देशासह राज्यातील मोठ्या शहरापासून, ग्रामीण भागातील गावा गावांमध्ये कर्करोगाचे रूग्ण आढळत आहेत. वेळेत योग्या निदान न झाल्यामुळे तसेच अपेक्षित उपचार न मिळाल्याने या महाभयानक रोगामुळे अनेकांचा बळी जात आहे. माञ डॉ. संदीप मुरुमकर यांनी ग्रामीण भागातील कर्करोग बाधीतांसाठी आधुनिक तंञज्ञानाच्या सहाय्याने तात्काळ कर्करोगाचे निदान करणारी तपासणी यंञणा कोपरगावमध्ये उपलब्ध झाली आहे.

अमेरिकेतील नामांकित अशोका कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका अर्थात ही सी एन नाशिक व वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर ग्रस्त रुग्णांसाठी मोफत आरोग्य सेवा सुरु केली असल्याची माहीती पञकार परिषद घेवून डॉ.‌ संदीप मुरुमकर, डॉ. राजेश वाळवेकर , डॉ. लोविन विल्सन, डॉ. जितेंद्र कार्लेकर यांनी दिली.

डॉ. मुरुमकर पुढे म्हणाले की, अशोका कॅन्सर सेंटर्स हे अमेरिकेतील असले तरीही त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रदिर्घ अनुभवाच्या जोरावर व कॅन्सर वर उपचार करणाऱ्या तज्ञ अनुभवी डॉक्टर आपल्याच देशातील महाराष्ट्रातील आहेत. त्यांच्याकडे  कॅन्सर रोगा संदर्भात विवीध प्रकारचे संशोधन केल्यामुळे केवळ मानवसेवेच्या करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरीकांना कॅन्सर सारख्या रोगांपासून वेळेत मुक्तता करण्याच्या शुध्द हेतूने आम्ही  अत्याधुनिक उपचार पध्दती उभी केली आहे.

ग्रामीण भागातील कर्करोग बाधीतांना सप्ततारांकीत उपचार सेवा देण्याची व्यवस्था अशोका कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका यांच्यावतीने नाशिक व  कोपरगाव येथेही सुरू करण्यात आले आहे. अशोकाचे कॅन्सर रोग तज्ञ हे कोपरगाव येथील वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस येथे प्रत्येक महिन्याच्या पहील्या तिसऱ्या बुधवारी सकाळी ११ ते ३ या वेळेत येणार आहेत. त्यामुळे जागतीक पातळीवर उपचार व रोगाचे निदान कोपरगावमध्ये होणार आहे.

सर्व आरोग्य उपचाराच्या शासकीय योजनामुळे कॅन्सर सारख्या महाभयानक रोगावर  मोफत उपचार सेवा तेही एकाच छताखाली केल्या जात आहेत. देशात अगदी मोजक्या ठिकाणी हि उपचार पध्दती सुरु झाली आहे. याचा सर्वाधीक  लाभ बाधीत रुग्णांस नातेवाईकांना होणार आहे. अनेकांना कॅन्सर झालेला असतो माञ कोणतेही लक्षणं न दिसल्यामुळे तसेच अचुक तपासणी न झाल्यामुळे लागन झाल्याचे कळत नाही अगदी शेवटच्या टप्प्यात लक्षात आल्यानंतर उपचार करताना अनंत अडचणी येवून जीव धोक्यात जातो.

वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कोपरगाव येथे डॉ. संदीप मुरुमकर यांचा अनेक वर्षाचा प्रदिर्घ अनुभव आहे अशातच स्टेनिंग तंञज्ञानाच्या सहाय्याने कॅन्सर व इतर आजाराचे अचुक निदान होत असल्याने अनेकांना जीवदान मिळत आहे. सोबतच अशोका कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका यांच्या साथीने कॅन्सर बाधीत रूग्ण कॅन्सर मुक्त जीवन जगण्यास मदत होईल.  या पञकार परिषदेच्या वेळी जावेद शेख , मधुकर पवार, शिरीष यादव, शशिकांत आहेरराव आदी उपस्थित होते. 

 कॅन्सर रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार  मिळवून देण्यापुर्ती मर्यादित आमचे काम नसुन ग्रामीण भागात कॅन्सर विषयी जनजागृती वाढवणे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे तसेच वेळेवर योग्य  उपचार मिळवून देणे हे उद्दिष्ट आहे. तसेच रुग्णांना त्यांच्या गावाजवळच तज्ञ डाॅक्टरांचा सल्ला उपचार करण्याची संधी देवून  रुग्णांचा पैसा व वेळ वाचेल.कर्करोगावरील उपचारावर सातत्य राखून विकार मुक्त करण्याचे ध्येय असल्याचे मत डॉ. लोविन विल्सन यांनी व्यक्त केले.

Leave a Reply