कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून लेखाशीर्ष ३०५४ व ३०६८ योजनेतून कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध गावातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी ३.९० कोटी रक्कमेच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी केली आहे.

कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी निधी मिळावा यासाठी अनेक प्रस्ताव शासनदरबारी सादर करून प्रस्ताव सादर केल्यापासून निधी मंजूर होवून लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत त्यासाठी आ.आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असतो त्यामुळे निधी मिळविण्यात अडचणी येत नाही. अशाच पाठपुराव्यातून ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी शासनाकडून ३ कोटी ९० लाखांच्या रस्त्याच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे निश्चितच सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामाबरोबरच अनेक रस्त्यांची कामे सुरु होणार असून त्यामुळे ज्या रस्त्यांच्या नागरीकांना अडचणी होत्या त्या अडचणी दूर होणार आहे.

या ०३.९० कोटी रक्कमेच्या निधीतून कोकमठाण येथील पुणतांबा रोड ते मारुती मंदीर ते देशमुख वस्ती रस्ता करणे (४० लाख), धोत्रे येथील चारी नं.०२ नारायण मिसाळ वस्ती (ग्रा.मा.६२) रस्ता करणे (२० लाख), सुरेगाव राज्यमार्ग ०७ ते वाबळे वस्ती (ग्रा,मा.१५) रस्ता करणे (५० लाख), सोनारी एम.डी.आर.०५ ते इजिमा २१६ पर्यंत (ग्रा,मा.१४) रस्ता करणे(२५लाख),जेऊर कुंभारी येथे समृद्धी डक ते तालुका हद्द (ग्रा.मा४८) रस्ता करणे (५० लाख), माहेगाव देशमुख सचिन खर्डे घर ते ग्रा.मा.१०१ पर्यंत रस्ता करणे (५०लाख),

सोनेवाडी येथे प्रजिमा ९८ ते दत्तमंदिर (ग्रा.मा.७५) रस्ता करणे (२५ लाख), पढेगाव गावठाण ते ४५ चारी (ग्रा.मा.१९) रस्ता करणे(३० लाख) तसेच मतदार संघातील राहाता तालुक्यातील जळगाव येथील जिल्हा परिषद शाळा एलमवाडी ते हनुमान मंदीर (ग्रा.मा.२०) रस्ता करणे (२५ लाख), पुणतांबा येथे रेल्वे गेट ते गोदावरी बंधारा (ग्रा.मा.५५) रस्ता करणे (४० लाख), शिंगवे येथील किरण जगन्नाथ चौधरी घर ते पाराजी पवार घर (ग्रा.मा.५६) रस्ता करणे (३५ लाख) या रस्त्यांची कामे होणार आहेत.

या प्रशासकीय मान्यतेमुळे कोपरगाव मतदारसंघातील अनेक ग्रामीण भागातील रस्ते नव्याने विकसित होणार असून, स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल. शासनाने मान्यता दिल्यानंतर लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल.रस्त्यांशिवाय विकास अशक्य असून चांगले रस्ते हे प्रत्येक गावाच्या प्रगतीचे प्रतीक आहेत.

त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक गावासाठी सुस्थित रस्ते निर्माण करणे हे माझे ध्येय असून यापुढील काळात लवकरच नागरीकांना ज्या रस्त्यांची कामे होणे अपेक्षित आहे त्या सर्वच रस्त्यांसाठी शासनाकडून निधी मंजुरी मिळवून ग्रामविकासाचा वेग आता अधिक वाढणार असल्याचा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.



 
						 
						