भाजप,आरपीआय व मिञपक्ष लोकसेवा आघाडीचे उमेदवार जाहीर

भाजप मिञ पक्षाचे पराग संधान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित

 कोपरगाव प्रतिनिधी दि. १२ : कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीत भाजप मिञ पक्ष अर्थात कोल्हे गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते अखेर भाजपचे पराग संधान यांची उमेदवारीला माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते यांच्या साक्षीने जाहीर करण्यात आले तसेच १५ प्रभागातील अनेक उमेदवारांची उमेदवारी यावेळी जाहीर करण्यात आली आहे.

 मंगळवारी सायंकाळी कलश मंगल कार्यालयात भाजप आरपीआय व मिञ पक्षाच्या अर्थात कोल्हे समर्थक लोकसेवा आघाडीच्या उमेदवारांची नावे कोअर कमिटीच्या वतीने किरण ठाकरे यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या साक्षीने जाहीर केले त्यात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून बाळासाहेब उर्फ पराग संधान यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थितांनी जल्लोष साजरा केला. 

उमेदवारांची घोषणा करतेवेळी कमिटेचे सदस्य  दिलीप दारुणकर, वैभव आढाव, संजय सातभाई, राजेंद्र जाधव, विजय आढाव, नारायण अग्रवाल, शरद थोरात, मच्छिंद्र केकाण, केशवराव भवर, विश्वासराव महाले, डॉ. अमोल अजमेरे, संदीप देवकर, बाळासाहेब नरोडे  शिवाजी दिवटे आदींची प्रमुख उपस्थिती होती . उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याने अनेक इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी  कार्यालयात मोठी गर्दी केली होती.

कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ची निवडणूक लढविण्यासाठी कोल्हे गट व  मिञ पक्षाच्या लोकसेवा आघाडीच्या वतीने नवी आशा नवी दिशा घेवून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केल्याचे आज दिसुन आले. या निवडणुकीत  प्रभागनिहाय तब्बल १६ नवीन  सुशिक्षित जनमत असलेल्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. अनेक तरुणांना संधी देत सर्व सामाजिक सर्व सामावेशक उमेदवारांचा मिलाफ करीत सामाजीक एकोपा  दाखवत  कोल्हेंनी नवे समिकरण या निवडणुकीत केले आहे.

 इच्छुकांची संख्या जास्त आहे, पण उमेदवारी मिळणाऱ्या पेक्षा न मिळाल्याची जबाबदारी अधिक आहे. तेव्हा त्यांचे आभार व आदर आम्हाला कायम असणार आहे. इच्छुकांनी माघार घेवून मनाचा मोठेपणा दाखवल्यामुळे इतरांना उमेदवारीची संधी मिळाली. कार्यकर्ता चांगला असला तरी काही जनमाणसातील अंदाज घेवून उमेदवार निवडण्याचे काम निवड कमिटीने केले. आपल्या पार्टीकडे  इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे त्यामुळे या निवडणुकीत आपली बाजू भक्कम आहे असे मत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त करीत उमेदवारी मिळालेल्यांना शुभेच्छा दिल्या व उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांचे आभार व्यक्त केले.

 यावेळी विवेक कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत अनेक इच्छुकांच्या मोठेपणामुळे  लोकसेवा आघाडीत  उमेदवारी निवडता आली आता ते निवडुन  आणण्याची मोठी जबाबदारी सर्वांचीच असल्याचे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या. भाजप आरपीआय  व मिञ पक्ष लोकसेवा आघ डी कोल्हे गटाकडून एकमत झालेल्या प्रभागाचे उमेदवार जाहीर करण्यात आले एकुण १५ प्रभागातील ३० उमेदवारांपैकी १९ उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. 

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान व  प्रभाग निहाय उमेदवारी पुढील प्रमाणे  १) दिपा वैभव गिरमे – वैभव सुधाकर आढाव २)राहुल उत्तमराव खरात – स्वाती दिपक जपे ३) जनार्दन सुधाकर कदम –  निश्चित होणे बाकी  ४)दिपाली संजय उदावंत –  निश्चित होणे बाकी ५)वैशाली विजय वाजे – निश्चित होणे बाकी  ६)मिञ पक्षाचे पद्मावती योगेश बागुल –  विक्रमादित्य संजय सातभाई  ७)प्रसाद बाळासाहेब आढाव – सोनल अमोल अजमेरे ८) मनिषा दत्तात्रय पगारे – फरदीन अलताफ कुरेशी ९) जितेंद्र चंद्रकांत रणशुर – विजया संदीप देवकर १०)रविंद्र दत्तात्रय कथले  –  वृषाली गणेश आढाव ११)निश्चित होणे बाकी -निश्चित होणे बाकी  १२)निश्चित होणे बाकी -निश्चित होणे बाकी  १३) स्वप्निल दिलीप मंजुळ – निलोफर फीरोज पठाण  १४) निश्चित होणे बाकी -निश्चित होणे बाकी  १५)सुरेखा विनोद राक्षे  – अनिल विनायक आव्हाड 

  यांना  उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित प्रभागातील उमेदवारा संदर्भात  काही चर्चा व वाटाघाटी  सुरु असून आज उद्या  इतर उमेदवार जाहीर होतील अशी माहीती विवेक कोल्हे व स्नेहलता कोल्हे यांनी दिली.  कोल्हे गटाचे उमेदवार निश्चित झाल्याने निवडणुकीच्या रिंगणात कोल्हे गट मोठ्या ताकतीने उतरला आहे तर आमदार आशुतोष काळे यांच्या गटाकडील नगराध्यक्षा सह इतर प्रभाग निहाय कोण उमेदवार असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Leave a Reply