कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव नगरपालीकेच्या निवडणुकीत कालपर्यंत काळे विरूद्ध कोल्हे यांच्यातच लढत होणार इतर राजकीय पक्षाचे इच्छुक दोन्ही गटात सामिल होतील असे वाटत असताना आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणाला निवडणुकीचे चिञ अचानक बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने अर्थात आमदार आशुतोष काळे यांच्या गटाकडून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरले तर भाजप आरपीआय मिञ पक्षाच्यावतीने अर्थात माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या गटाकडून पराग संधान हे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उतरले आहेत त्यांनी तसा उमेदवारी अर्ज भरले आहेत.

माञ अचानक माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी न मिळाल्याने एकनिष्ठ असलेले झावरे ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी काळे-कोल्हे यांच्या विरोधात झावरे यांना नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवून प्रभाग निहाय नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केल्याने शिवसेना काय चमत्कर घडवणार याची उत्सुकता लागली.

तर काळे कोल्हे यांना उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सपना मोरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरुन दुसरे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे केवळ काळे-कोल्हे यांच्यात दुरंगी वाटणारी हि निवडणुक तिरंगी, चौरंगी झाली त्यातही अपक्ष उमेदवारामध्ये माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून पुन्हा काळे कोल्हेंसमोर दोन हात केले. कोल्हे गटाचे निष्ठावंत असणारे दिपक वाजे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरुन नगराध्यक्ष पदासाठी मोठी ताकत लावत आहेत. वाजे यांनी प्रचारातही आघाडी घेतल्याने काळे- कोल्हेंची डोकेदुखी वाढणार आहे.

वहाडणे व वाजे यांच्या बरोबरच योगेश वाणी व रहिमुलीस कुरेशी हे काय भुमिका घेता यावर काही गणितं आहेत. आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे हे दोन्ही शिवसेनेची कशी मनधरणी करतात की, लढण्यासाठी खुलं मैदान करुन देतात हे बघणं महत्त्वाचं आहे. तसेच अपक्ष इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी मनधरणी करणार की, डाव प्रतिडाव टाकण्याचा नवा खेळ खेळणार हे अर्ज माघार घेण्याच्या अंतिम क्षणी स्पष्ट होईल.

पण काहीही झाले तरी सध्या दुरंगी वाटणारी निवडणूक चौरंगी वरुन पंचरंगी होते की, काय असेच वाटत आहे. या निवडणुकीत काळे-कोल्हे यांची डोकेदुखी शेवटपर्यंत वाढणार त्यामुळे काळे -कोल्हेंच्या नव्या पिढीचा नवा राजकीय डाव कसा खेळतात याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.


