कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८: कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षसह सदस्यांसाठी २३७ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. आज झालेल्या प्रभागनिहाय छाननीमध्ये त्यापैकी ५६ नामनिर्देशन पत्र अवैध तर १८१ वैध म्हणून घोषित करण्यात आले. निवडणूक निणर्य अधिकारी श्रीमती भारती सागरे, सहायक निवडणूक अधिकारी, तहसीलदार महेश सावंत व प्रशासक सुहास जगताप यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली.

नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते, मात्र त्यापैकी एक अर्ज छाननीत अवैध घोषित करण्यात आला. प्रभागनिहाय वैध व अवैध अर्ज खालीलप्रमाणे –प्रभाग एक अ – ३-० , ब ५-० प्रभाग दोन अ -५-२ , ब -५-१ , प्रभाग तीन अ -२-१ ब, ६-१ प्रभाग चार अ -४-२, ब-६-१ प्रभाग पाच अ -३-४ , ब -५-२ प्रभाग सहा अ -४-० ब -६-२ प्रभाग सात -३-१ , ब-४-० , प्रभाग आठ अ – ११- ४ , ब -१० – ५ प्रभाग नउ अ -७-६ , ब -८-२ प्रभाग दहा अ -२-० , ब -३-० प्रभाग अकरा अ -६-२ ब -८-४, प्रभाग बारा अ -८ -३ ,ब -७-१ , प्रभाग तेरा अ -५-१ , ब -९-१ , प्रभाग चौदा अ -६-३ ,ब -७-३ प्रभाग पंधरा अ -३-१ ,ब -६-२

नगराध्यक्षपदासाठी एकूण नऊ उमेदवारांचे १४ अर्ज तर ३० सदस्यासाठी १५२ उमेदवारांचे १८१ अर्ज आहेत. या उरलेल्या अर्जामध्ये काहीं उमेदवारांनी आपलेच दोन अर्ज दाखल केले आहेत. आज झालेल्या छाननीत अनेक उमेदवारांचे पक्षाचे ए बी फॉर्म नसणे, प्रतिज्ञापत्रक नसणे व काही तांत्रिक कारणावरून ५६ नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले आहेत. दि. १९ ते २१ नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. दि .२१ नोव्हेंबरला पालिका निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

आज झालेल्या छाननीमध्ये प्रभाग क्रमांक आठ (अ ,ब) मध्ये ३० उमेदवारांचे अर्ज दाखल होते त्यापैकी सर्वाधिक ९ अर्ज बाद झाले. प्रभाग क्र नऊ (अ,ब) मध्ये २३ अर्जांपैकी ८ अर्ज बाद ठरविण्यात आले. प्रभाग नऊ अ मध्ये सर्वाधिक ६ उमेदवारांचे अर्ज बाद घोषित झाले. तर प्रभाग क्र एक व दहा मध्ये एक हि अर्ज अवैध घोषित करण्यात आलेला नाही.


