कोपरगाव प्रतिनिधी, दि १३ : श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात शालेय गणित- विज्ञान, चित्रकला व पर्यावरण प्रदर्शन नुकतेच मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. या प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेचे सदस्य व क्रेडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे यांच्या हस्ते करण्यात आले. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा या दृष्टीने हे शालेय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन खुप महत्वाचे आहे त्यामुळे मुलामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागतो असे ते म्हणाले.

यावर्षी आयोजित विज्ञान-गणित प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते आठवी गटात ७८ उपकरणे तर इयत्ता नववी दहावी गटात ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रदर्शनाला स्कूल कमिटी चेअरमन चंद्रकांतशेठ ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे सहसचिव सचिनअजमेरे, सदस्यआनंद ठोळे, डॉ. अमोल अजमेरे, संदीप अजमेरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता मालकर यानी भेटी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रघुनाथ लकारे उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर यानी सर्वाचे स्वागत केले.पर्यवेक्षक बलभीम उल्हारे यानी आभार मानले.

गणित-विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता कुलदीप गोसावी, अतुल कोताडे, सुरेंद्र शिरसाळे, संजय बर्डे, दिगंबर देसाई, निलेश होन, पंकज जगताप, सचिन डोळे, सौ.श्वेता मालपुरे, कविता जाधव, सविता वाडीले, संजीवनी डरांगे, रुपाली साळुंखे,स्वाती जाधव, सुजाता अजमेरे, शिल्पाअजमेरे, शीतल अजमेरे ,अनाली सोनवणे, अश्विनी गायकवाड, सौ.गौरी जाधव, छाया निंबाळकर, नेताजी नाईक आदि शिक्षकांनी विशेष परीश्रम घेतले.


