संजीवनी अकॅडमीच्या बाल तंत्रज्ञांनी राष्ट्रीय स्पर्धेत मिळविली ६४ हजारांची बक्षिसे – डॉ.मनाली कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १९ : येथिल संजीवनी अकॅडमीच्या बाल तंत्रज्ञांनी दिल्ली येथे क्रीएटीव्हीटी लिग प्रायोजीत व भारत सरकारच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), दिल्ली आयोजीत राष्ट्रीय  तांत्रिक स्पर्धेत तब्बल ६४ हजार रूपयांची बक्षिसे जिंकून आपल्या प्रतिभा संपन्नेतुन तंत्रज्ञ जाणकारीचे प्रदर्शन घडविले.

संपुर्ण देशातील मोठ्या महानगरातील स्पर्धक असुनही संजीवनी अकॅडमी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संजीवनी अकॅडमीतुन मिळालेल्या तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर रोबोवार व रोबोक्वेस्ट प्रकारात नैपुण्य मिळविले. संजीवनीच्या बालकांची तंत्रज्ञानावरील पकड पाहुन दिल्ली येथे संजीवनीचाच बोलबाला पहायला मिळाला. या यशामुळे संजीवनीच्या शिरपेचात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

डॉ. कोल्हे पुढे म्हणाल्या की, दिल्ली येथे रोबोक्वेस्ट स्पर्धेत ओजस अमोल पहिलवान, अमेय योगेश  बनकर, उत्कर्ष  मुकूल खासणे आणि शाहू  प्रसादकुमार निकम यांनी देश पातळीवर ५० स्कूल्सच्या सुमारे ५०० स्पर्धकांमधुन दुसरा क्रमांक मिळविला. त्यांच्या या यशाबध्दल रू 30,000 किमतीचे ड्रोन बक्षिस मिळाले. याच स्पर्धेत शौर्य अमितकुमार कालगुंडे आणि सार्थक उमेश पवार यांना तृतिय क्रमांक मिळाला. त्यांना रू ४००० किमतीचे रोबोक्वेस्ट किट बक्षिस मिळाले. रोबोवार प्रकारात प्रज्वल भागवत भड आणि सर्वेश तुषार शेळके यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि रणनिती दाखवत देशात दुसऱ्या क्रमांकाचे यश  मिळविले. त्यांना रू ३०,००० किमतीचे ड्रोन बक्षिस मिळाले.

संजीवनीच्या या बाल तंत्रज्ञांचे यश हे मेहनत, नवकल्पना, संघभावना आणि शिक्षकांच्या सातत्यपुर्ण पाठींब्याचे प्रतिक मानले जाते. या स्पर्धेत देशभरातुन सुमारे ५००० संघांनी भाग घेतला होता.  यापुर्वीही संजीवनी अकॅडमीच्या बाल तंत्रज्ञांनी आयआटी बॉम्बे, आयआटी  इंदौर, आयआयटी गांधीनगर, आयआयटी गुवाहाटी येथे तांत्रिक स्पर्धांमध्ये भाग घेवुन यश  संपादन केले होते. या सर्वांना संजीवनी अकॅडमीचे टेक्निकल कोच व नॅशनल ट्रॅक  रेकॉर्ड असणारे प्रा. आदित्य गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

 संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत यशस्वी स्पर्धकांचे व त्यांच्या पालकांची अभिनंदन केले. तसेच या पुढीलही  विविध स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्या शैला  झुंजारराव व हेड मिस्ट्रेस अपर्णा  फडणीस यांचेही अभिनंदन केले. डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार केला. यावेळी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आर. ए. कापगते यांची प्रमुख उपस्थिती होती.  

Leave a Reply