संजीवनीच्या २० मुलींना इन्फोसिसमध्ये नोकरी

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २९ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट (टी अँड  पी) विभागाच्या प्रयत्नाने अनेक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, हे अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. अशाच  प्रयत्नातुन इन्फोसिस कंपनीचे कॅम्पस प्लेसमंट ड्राईव्हचे आयेजन करण्यात आले होते. यात कंपनीने बी. टेकच्या अंतिम वर्षातील २० मुलींना आकर्षक वार्षिक  पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे.  संजीवनीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षणसोबतच ‘शिक्षणातुन रोजगार’ हे ध्येय साधले असल्याचे संजीवनीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, उद्योग जगताशी जोडणारे प्रशिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रम, कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह, तसेच नामांकित कंपन्यांशी  केलेली भागीदारी यामुळे संजीवनीचे विद्यार्थी नामांकित कंपन्यांच्या कसोटीत उतरत आहेत. इन्फोसिस कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागातील जागृती राजेश  बांगर, अश्विनी  चौधरी, साक्षी संतोष  घोरपडे, आदिती रविंद्र देठे, वैष्णवी  अनिल नरोडे, रेणुका महेश शिंदे , प्रतिक्षा बाबासाहेब चांदर,इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या दिशा  बिपिन ढाकणे,

अमृता सखाराम वडणे, संतोषी  पंडीत कदम, शिवानी रविंद्र जगताप, पुजा श्रावण कोळपे, स्नेहा सोमनाथ मोरे, अपूर्वा बाळासाहेब फापाळे, जान्हवी किरण राकिबे, श्वेता  चंद्रकांत साळुंके, इलेक्ट्रॉनिक्स अँड  कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या साक्षी सचिन गौल, रविशा  रवी हलवाई, वैष्णवी  दत्तु निकम व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या अक्षदा देविदास देवकर यांची निवड केली आहे.

 नाशिक  जवळच्या लहवित गावात माझ्या वडीलांची शेती  आहे. इ. १२ वी नंतर मला इंजिनिअरींगच करायचे होते, त्यासाठी मी दोनच कॉलेजचा पर्याय ठेवला होता. त्यातील माझा पहिला पर्याय संजीवनी होता आणि मला संजीवनी मध्येच प्रवेश  मिळाला. येथील शिक्षक  आमच्याकडून अभ्यास करून घ्यायचे. टिचिंग प्लानप्रमाणे येथे शिकविण्यावर भर असल्याने परीक्षेच्या अगोदर अभ्यासासाठी पुरेसा वेळ असायचा. विशेष  म्हणजे या कंपनीची योग्यता चाचणी ( अॅप्टीट्यूड टेस्ट) खुप महत्वाची असते. त्यासाठी कॉलेजने आमच्यासाठी नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त तासिका आयोजित केल्या होत्या. त्याचा खुप फायदा झाला. तसेच कंपनीच्या मुलाखतीं अगोदर कंपनीच्या कार्यपध्दतीला अनुसरून आमच्या मुलाखतींचा सराव करून घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत त्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनवण्याचे कार्य कॉलेज सातत्याने करत आहे. त्यामुळे संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज ही केवळ शिक्षण  देणारी संस्था न राहता, तर तरूणांच्या उज्वल भविष्यासाठी  रोजगाराच्या दारे उघडणारी विश्वासार्ह आणि प्रेरणादायी संस्था आहे, असे मला वाटते. यामुळे माझ्या करीअरची चांगली सुरूवात झाली आहे.- जान्हवी राकिबे (नोकरीसाठी निवड झालेली विद्यार्थिनी)       

 संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या मुलींचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे तर मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व मुलींचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डायरेक्टर डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, विभाग प्रमुख डॉ. डी.बी. क्षिरसागर, डॉ. आर. ए. कापगते व डॉ. माधुरी जावळे उपस्थित होते.

Leave a Reply