उपनगराध्यक्ष पदी भाजपचे जितेंद्र रणशुर १९ मतांनी विजयी

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काळे-कोल्हे यांनी आपापली शक्ती पणाला लावून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला. माञ मतदारांनी कोल्हे यांना पसंती देत कोल्हे गटाचे पराग संधान यांना नगराध्यक्षपदी विराजमान करीत १९ नगरसेवक निवडून देत पालीकेत पुर्ण सत्ता दिली, अशातच सोमवारी उपनगराध्यक्ष पदासह स्विकृत नगरसेवकांची नुकतीच निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप व मिञ पक्षाचे अर्थात जनस्वराज्य आघाडीच्यावतीने जितेंद्र रणशुर यांचा उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे देण्यात आला.

हि निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असताना आमदार आशुतोष काळे गटाकडून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस कडून उपनगराध्यक्ष पदासाठी वाल्मिक लहीरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पालीकेच्या पहील्या विशेष सभेत नगराध्यक्ष पराग संधान यांनी दोन्ही उमेदवारांचे अर्ज स्विकारुन  उपनगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया राबवली त्यात जितेंद्र रणशुर यांना हात उंचकरुन प्रथम मतदान झाले. यावेळी नगराध्यक्षासह १९ नगरसेवकांनी मतदान केले तर  वाल्मिक लहीरे यांना राष्ट्रवादीच्या आकरा नगरसेकांनी मतदान केल्याने १९ मतांच्या बहुमतावर जितेंद्र रणशुर यांच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडली.

 दरम्यान भाजप व मिञ पक्षाच्यावतीने स्विकृत नगरसेवक पदासाठी अतुल धनालाल काले व सोनल अमोल अजमेरे यांची नावे जाहीर करण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश उर्फ बाळासाहेब फकिरराव रुईकर यांच्या नावाची घोषणा नगराध्यक्ष पराग संधान यांनी सभागृहात केली. यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नुतन नगराध्यक्ष पराग संधान यांचा सन्मान केला तर पालीकेच्या सर्व विभागाचे प्रमुखांनी उपनगराध्यक्ष रणशुर, स्विकृत नगरसेवक काले, अजमेरे, रुईकरसह उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविकांचा सन्मान व स्वगात केले.

 दरम्यान उपनगराध्यक्षपदाची निवडून बिनविरोध व्हावी अशी  मागणी सभागृहात भाजपचे गटनेते प्रसाद आढाव यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी आढाव यांची विनंती फेटाळत निवडणूक घेण्याची मागणी सभागृहात केल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणुक घेण्यात आली, त्यात जितेंद्र रणशुर यांचा विजय झाला तर वाल्मिक लहीरेंचा पराभव झाला. उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जितेंद्र रणशुर यांनी सभागृहात माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपिन कोल्हे व युवा नेते कोल्हे यांच्यामुळे एका दलित कार्यकर्त्याला उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली.

माञ  विरोधी पक्षाने एका दलित कार्यकर्त्याला उपनगराध्यक्ष पदी बसुनये यासाठी हि निवडणूक बिनविरोध होवू दिली नाही. गेल्या  ४० वर्षानंतर पहील्यांदा कोणतही आरक्षण नसताना कोल्हेंनी अनुसूचित जातीचा उपनगराध्यक्ष केला.  हि निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते पण विरोधकांनी बिनविरोध केली नाही. दलित कार्यकर्त्याला विरोध करुन विरोधकांनी सर्व  दलित व्यक्तीला विरोध केला असे म्हणत खंत व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले  निवडून आलेल्यांचे अभिनंदन करतो. निवडणुकीत पुरते राजकारण आता  राजकारण संपलं आहे. सर्वांना बरोबर घेवून काम करायचे आहे पण विरोधकांनी हि निवडणूक बिनविरोध करुन मनाचा मोठेपणा दाखवला नाही अशी खंत करीत विकास कामांना प्राधान्य देणार आहोत असेही ते म्हणाले. 

यावेळी  विरोधी पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षांनी आम्हाला विश्वासत घेतले नाही, आमच्याशी कसलीही चर्चा केली नाही. त्यामुळे लोकशाही पध्दतीने आम्ही आमचा उमेदवार उभा केला. सभागृहात आमची बाजू मांडून बहुमताना निवड झालेल्याबद्दल उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवकांचे आभार मानायला सुध्दा सत्ताधाऱ्यांनी आम्हाला संधी दिली नाही अशी खंत पहाडे यांनी व्यक्त करून सत्ताधाऱ्यांचा निषेध  केला.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जनार्दन कदमसह ११ नगरसेवकांची नाराजी स्पष्ट दिसत होती तर सत्ताधारी गटामध्ये जल्लोषाचे वातावरण होते. 

Leave a Reply