आमदार काळेंमुळे शहराचा पाणी पुरवठा नियमितपणे होणार – गटनेत्या गौरी पहाडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाला असल्यामुळे नागरीकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा दिवसांमध्ये वाढ करण्याचे कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु आ.आशुतोष काळे यांनी तातडीने गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना दिल्यामुळे साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून कोपरगाव शहराचा पाणी पुरवठा नियमितपणे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व १२ नगरसेवकांनी सोमवार (दि.१२) रोजी कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावांची पाहणी केली यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मागील आठवड्यात आ. आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांसमवेत कोपरगाव नगरपरिषद कार्यालयाला भेट दिली असता कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावांचा पाणी साठा कमी झाल्यामुळे पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले.

चार दिवसांनी होणाऱ्या पाणी पुरवठ्यात बदल करून पाणी पुरवठा कालावधी वाढविण्यात आला असल्याचे सांगितले. त्यावेळी कोपरगावकरांना पाणी पुरवठ्याची अडचण होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून तातडीने गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्या सूचनेची पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित अंमलबजावणी करून तात्काळ गोदावरी कालव्यांना पाणी सोडले व आज सोमवार (दि.१२) रोजी प्रत्यक्षात साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोपरगावकरांवर जास्त दिवसांनी पाणी पुरवठा होण्याची टांगती तलवार आ.आशुतोष काळे यांच्यामुळे दूर झाली आहे.

त्यामुळे आता कोपरगावकरांना नियमितपणे पूर्वीप्रमाणे चार दिवसाआड पाणी पुरवठा करावा असे गटनेत्या सौ.गौरी पहाडे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गटनेत्या सौ.गौरी पहाडे यांच्या समवेत नगरसेविका सौ.माधवी वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, जनार्दन कदम, सौ.निर्मला आढाव, सौ.स्मिता साबळे,इम्तियाज अत्तार,वाल्मिक लाहीरे, राहुल शिरसाठ, सौ.सोनम त्रिभुवन, सौ.सोनाली कपिले, बाळासाहेब रुईकर आदीसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.    

Leave a Reply