‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पुन्हा ई-केवायसीची संधी – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : लाडकी बहिण योजनेच्या बाबतीत तांत्रिक चुकांमुळे लाडक्या बहिणींवर अन्याय नको अशी भूमिका घेवून ज्या महिलांचे लाडक्या बहिणींचे महिन्याला मिळणारे दीड हजार रुपये बंद झाले होते त्या लाडक्या बहिणींना पुन्हा ई केवायसी करण्याची संधी मिळावीण्यासाठी आ.आशुतोष काळे यांचा महायुती शासनाकडे पाठपुरावा सुरु होता.

राज्यातील असंख्य महिला भगिनींची पुन्हा ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी होती. त्यामुळे ई केवायसी करतांना तांत्रिक चुकांमुळे ज्या लाडक्या बहिणींचे महिन्याला मिळणारे दीड हजार रुपये बंद झाले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा ई केवायसी करण्याची संधी देण्यात येणार असून त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी महायुती शासनाचे आभार मानले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अपात्र असणाऱ्या व्यक्तींनी गैरफायदा घेवू नये यासाठी राज्य शासनाकडून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसीच्या माध्यमातून फेर तपासणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी करायची राहिली होती. 

कोपरगाव मतदारसंघातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणाऱ्या अनेक महिलांनी ई-केवायसी न केल्यामुळे तसेच काही महिलांकडून ई-केवायसी करतांना अज्ञानापोटी किंवा नजरचुकीने चुकीची माहिती भरली गेल्यामुळे कोपरगाव मतदार संघातील असंख्य लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या दीड हजार रुपयांचा लाभ मिळणे बंद झाले आहे.

असंख्य लाडक्या बहिणी पात्र असतांनाही नजरचुकीने झालेल्या तांत्रिक चुकांमुळे त्यांच्यावर अन्याय होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या ई केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करून महायुती शासनाकडे देखील त्यांचा पाठपुरावा सुरु होता. तसेच राज्यातील महिलांची देखील मागणी होती.  

त्याची महायुती शासनाने दखल घेवून ज्या लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या दीड हजार रुपयांचा लाभ मिळणे बंद झाले आहे त्यांच्यासाठी पुन्हा ई केवायसी करण्याची संधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी ई केवायसी करतांना झालेली चूक सुधारण्याची संधी मिळणार असून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पडताळणी केली जाणार आहे. लाडक्या बहिणींना मिळणारे दीड हजार रुपये केवळ आर्थिक सहाय्य नसून त्यांच्या आत्मसन्मानाचा आधार आहे. 

त्यामुळे तांत्रिक चुकांमुळे कोणत्याही पात्र बहिणीवर अन्याय होऊ नये यासाठी महायुती शासनाने पुन्हा ई-केवायसीची संधी दिली. याचा मनापासून आनंद होत असल्याचे सांगत आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याच्या महिला बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply