कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी काॅलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चला (डी.फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी व पीएच.डी. सेंटर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून २०२३-२४ या वर्षाच्या ‘बेस्ट काॅलेज अवार्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कुलगुरू डाॅ. सुरेष गोसावी, प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे यांच्या हस्ते व सिनेट मेम्बर राजेंद्र विखे यांच्या उपस्थितीत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. विपुल पटेल, विभाग प्रमुख, डीन, रजिस्ट्रार, आदींनी हा पुरस्कार समारंभपुर्वक स्वीकारला. या पुरस्कारने संजीवनीच्या शिरपेचात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीने अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, संजीवनी फार्मसी माहाविद्यालयाने आतापर्यंत अनेक कीर्तिमान स्थापित करीत महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक दर्जेेदार वेगळे स्थान निर्माण केले आहे. कारण हे महाविद्यालय विनाअनुदानित फार्मसी संस्थांमधिल ‘ऑटोनॉमस’ दर्जा प्राप्त करणारे देशातील ९ वे महाराष्ट्रातील १ ले महाविद्यालय ठरले आहे. देश पातळीवर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून या महाविद्यालयास १०१-१२५ रॅन्क बॅण्ड हे एनआयआरएफ रॅन्कींग मिळालेले आहे. अशा अनेक बाबी महाविद्यालयाच्या जमेस आहे.
या सर्व बाबींचा परीपाक म्हणुन सा. फु. पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या (इंजिनिअरींग, फार्मसी, एमबीए, आदी) सर्व संस्थामधुन संजीवनी फार्मसी महाविद्यालय हे चालु वर्षीच्या ‘बेस्ट काॅलेज अवार्ड’ या मानाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले.
‘दर्जा व गुणवत्तेशी कधीही तडजोड करायची नाही. काळानुरूप प्रत्येक क्षेेत्रात बदल होत असतात, ते अंगीकारून सध्याच्या पध्दतींमध्ये बदल करणे अनिवार्य असते, नाहीतर बदल आपल्याला बदलण्यास कारणीभुत ठरतात. उद्योग जगत आणि शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वय ठेवुन विद्यार्थ्यांनी शिक्षण पुर्ण झाल्यावर स्वावलंबीच झाले पाहीजे, अशी शिकवण संस्थेचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची असायची. त्यांच्या संकल्पनेनुसार संजीवनी फार्मसी महाविद्यालयाने ऑटोनाॅमस दर्जा प्राप्त केला. आजचा पुरस्कार हा स्व. कोल्हे यांच्या शिकवणीचे फलीत आहे. हा पुरस्कार आम्ही स्व. कोल्हे यांच्या स्मृतीस समर्पित करीत आहोत.’- नितिन कोल्हे, अध्यक्ष, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, कोपरगाव.
विद्यापीठ नियुक्त समितीने अनेक निकषांची पुराव्या सहित शहानिशा केली. यात प्रामुख्याने नामांकित कंपन्यांमध्ये संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या, विद्यापीठ मान्यता प्राप्त पीएच.डी. सेंटर मधुन होणारे संशोधन, महाविद्यालयातील पीएच.डी गाईड्सच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी करीत असलेले संशोधक विद्यार्थ्यांची संख्या, विविध उद्योगांशी केलेले सामंजस्य करार व त्यांची फलनिष्पत्ती, विद्यार्थी व शिक्षकांनी सादर केलेले शोध निबंध,
विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसीत करण्यासाठीचे प्रयत्न, पुढील पाच वर्षांचा महाविद्यालयाचा कृती आराखडा, उद्योग जगताची अधिक माहिती होण्यासाठी तज्ञ व्यक्ती तसेच माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन परीषदा, पुर्ण क्षमतेने होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांची इंटर्नशिप, अशा अनेक बाबी तपासण्यात आल्या. विशेष करून पर्यावरण संवर्धनासाठी वापरण्यात येणारी सौर उर्जेवरील वीज, कॅम्पसमध्ये हिरवीगार वनराई, पालापाचोळा व इतर टाकावु वस्तुपासुनची खत निर्मिती, उत्कृष्ट मेंटर सिस्टिीम, आदी बाबींनी विद्यापीठाच्या समितीचे लक्ष वेधुन घेतले.