कोजागिरीच्या अमृत सोहळ्याची जय्यत तयारी – संत परमानंद महाराज

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ :  सबका मालिक आत्मा हा गुरु मंञ संपूर्ण विश्वाला देणारे प.पू. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या सानिध्यात कोजागिरीच्या चौदस पर्वावर अमृत महोत्सवाची जय्यत तयारी नाशिक येथे करण्यात आली आहे. अशी माहिती आत्मा मालिक ध्यानपिठ मिशन प्रमुख, संत परमानंद महाराज यांनी दिली आहे.

 उत्सवाच्या जय्यत तरी बाबत अधिक माहिती देताना आत्मा मालिक ध्यान योग मिशिनचे प्रमुख प.पू. संत परमानंद महाराज म्हणाले की, ज्या प्रमाणे कलात्मक निष्कलंक चंद्र हा कलंक युक्त पुर्ण चंद्रापेक्षा  अधिक आदरणीय असतो त्याप्रमाणे साधक आपल्या विशाल संपत्तीने नव्हे तर आत्मिक संपदेमुळे  महत्व प्राप्त करत वंदनीय व आदरणीय होतो. म्हणुनच प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कोजागिरी शरद पौर्णिमेस  आत्मस्वरूप सद्गुरू देवांच्या सानिध्यात या शाश्वत संदेशांचा व आत्मकृपेच्या प्राप्तीसाठी  नाशिक येथील  गोदावरीच्या निर्मळ  परिसरातील इंद्रायणी  लाॅन्स  येथे कोजागिरी अमृतमहोत्सव ( चौदस) च्या कार्यक्रमाचे आयोजन भव्य स्वरुपात केले आहे. 

शुक्रवार दि.२७ ऑक्टोबर चौदस महोत्सवाचा सकाळच्या व मध्यानच्या  सञातील सर्व कार्यक्रम कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणच्या आत्मा मालिक ध्यानपिठामध्ये होतील त्यानंतर  दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चे कार्यक्रम नाशिकच्या इंद्रायणी लाॅन्स या ठिकाणी संपन्न होतील त्यामध्ये आत्मस्वरूप अवतारलीला पठण  ( पारायण), भजन, ध्यान, मौन व महाआरती होईल. या सोहळ्यास परराज्यातील भाविकांसह परदेशातील भक्त देखील कोकमठाण आश्रम मध्ये दाखल झालेले आहेत. 

सोहळ्यातील महाआरती नंतर उपस्थित सर्व आत्मप्रेमींसाठी महाप्रसाद व दूधाच्या प्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील कार्यक्रमात यशस्वीतेसाठी आत्मा मालिक नाशिक जिल्हा सत्संग समिती विषेश तयारी करणार आहे. त्यांना संपूर्ण आत्मा मालिक भक्तांची साथ लाभणार आहे, तेव्हा या अभुतपुर्व महोत्सवात सर्व भाविकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आत्मा मालिक ध्यान योग मिशिनचे प्रमुख प.पू. संत परमानंद महाराज यांनी केले आहे.