५ नं. साठवण तलावाचा दगड, मुरूम रस्त्यांसाठी उपलब्ध करून द्या- राष्ट्रवादी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२: कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु असून मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. या उत्खननामधून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारा मुरूम व दगड उपलब्ध करून द्यावा व कोपरगाव नगरपरिषदेने उपलब्ध होणाऱ्या दगड, मुरुमाचा उपयोग कोपरगाव शहरातील हद्दवाढ झालेल्या भागातील व उपनगरातील रस्ते तयार करण्यासाठी करावा अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे लेखी मागणीचे निवेदन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय बोरुडे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना नुकतेच देण्यात आले आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की, कोपरगाव शहराच्या प्रलंबित असलेले विकासाचे मुलभूत प्रश्न मार्गी लावतांना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांचा अत्यंत जिव्हाळयाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून मार्गी लावला आहे. येसगांव हद्दीत कोपरगांव नगरपरिषदेच्या मालकीच्या इतर चार साठवण तलावा शेजारी या नवीन साठवण तलाव क्र.५ चे काम युद्ध पातळीवर सुरु असून दररोज मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत आहे.

या उत्खननामधून मोठ्या प्रमाणावर मुरूम व दगड उपलब्ध होत असून सदरचा दगड व मुरूम रॉयलटीवर देण्याबाबत प्रशासनाकडून वृत्तपत्राद्वारे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादीने सदरचा मुरूम व दगड कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील नवीन वाढीव भाग तसेच शहरातील उपनगरमधील जे रस्ते खराब झालेले आहे व नवीन रस्ते ज्या ठिकाणी तयार करावयाचे आहे अशा सर्व रस्त्यांकरिता वापरला जावा अशी मागणी केली आहे.

जेणेकरून रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात होणारा खर्च काही प्रमाणात कमी होवून कोपरगांव नगरपरिषदेवरील पडणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल व शहरातील सर्व रस्त्यांचा विकास होण्यास मदत होवून नागरिकांची होत असलेली गैरसोय देखील टळणार आहे. त्यासाठी साठवण तलाव क्र.५ चे उत्खननामधून निघणारा मुरूम व दगड कोपरगांव नगरपरिषदेस उपलब्ध करून द्यावा व कोपरगाव नगरपरिषदेणे उपलब्ध होणाऱ्या मुरूम व दगडातून कोपरगाव शहर व उपनगरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, संदीप पगारे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, बाळासाहेब रुईकर, संदीप कपिले, धनंजय कहार, ऋषीकेश खैरनार, आकाश डागा, सचिन गवारे, मनोज नरोडे, तेजस साबळे, बाळासाहेब सोनटक्के, विलास आव्हाड, एकनाथ गंगूले, राकेश शहा, चांदभाई पठाण, विकी जोशी, फिरोज पठाण, जुनेदशेख, पीरसाहब पठाण, आशा भोसले, सुरेश दुशिंग, नारायण पवार, वाल्मिक पवार, आधार पवार, वाल्मिक भोसले, संगीता जाधव, सिताराम लव्हाळे,

गोरख लव्हाळे, संतोष लव्हाळे, संतोष लव्हाळे, नामदेव लव्हाळे, सखाराम भोसले, बाबासाहेब भोसले, नाना जाधव, यादव पवार, सहादू पवार, यशवंत पवार, वामन चव्हाण, बबन चव्हाण, दादाभाऊ चव्हाण, अशोक बाबर, रामनाथ लोणारी, गोरख पवार, मन्छिंद्र पवार, जालिंदर पवार, दिपक सोनवणे, अंकुश झुंजारराव, अमित झुंजारराव, बाळु साळुंके आदी उपस्थित होते.