उपमुख्यमंत्री पवारांच्या उपस्थित काळे कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२३/२४ च्या ६९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवार (दि.२४) रोजी दुपारी १२.०० वाजता कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक, जेष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे यांचे अध्यक्षतेखाली तसेच संचालक सूर्यभान कोळपे व त्यांच्या सुविद्य पत्नी चंद्रकला कोळपे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करून कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

यानिमित्ताने कारखाना कार्यस्थळावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला असल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी दिली आहे. मागील वर्षी कारखाना विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्यातील १०० टन क्षमतेचा बॉयलर, ०८ मेगा वॅटचे टर्बाईन व चार मिलचे काम पूर्ण करून ६८ वा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

यावर्षी दुसऱ्या टप्प्यात बॉयलिंग हाऊसची उभारणी करण्यात येवून उभारणीचे काम देखील पूर्ण झाले असून पूर्णपणे आधुनिकीरणाच्या माध्यमातून ६९ वा गळीत हंगाम सुरु करण्यास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखाना सज्ज झाला आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या कारखान्याच्या गाळप हंगाम २०२३/२४ च्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्यावर व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे व्हा. चेअरमन डॉ. मच्छिंद्र बर्डे व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.