आव्हाण्याला अंगारखी निमित्त यात्रोत्सव

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : तालुक्यातील श्री क्षेत्र आव्हाणे बु येथील स्वयंभू निद्रिस्त गणपती देवस्थानात मंगळवारी (दि.१० )  अंगारखी चतुर्थी निमित्ताने यात्रोत्सव तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त देवस्थानात सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसरात पानाफुलाची, मेवा मिठाईची, खेळण्याची, कपडे, इलेक्ट्रॉनिकसाहित्याची, ज्वेलरी आदी साहित्याची दुकाने सजली आहेत.

   सकाळी ७ ला स्वयंभू गणपतीची अरती व महाभिषेक श्रीकांत जोशी, दादासाहेब म्हस्के, संजय चोथे, मधुकर वाणी, विजय मुळे, आदिनाथ पादीर यांच्या हस्ते करण्यात येईल. ९ वाजता हभप किशोर महाराज सुर्यवंशी यांचे जाहीर हरिकीर्तन, दुपारी १२ला याच भाविकांनी फराळ व्यवस्था केली आहे. रात्री ७ ला रायभान नांगरे यांचे हस्ते आरती व महाभिषेक होणार आहे.

नांगरे यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून रात्री दादोबा देव भजनी मंडळाच्यावतीने जागर कार्यक्रम होणार आहे. तरी या धार्मिक कार्यक्रमाचा  पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रा . मालोजीराव भुसारी, सरचिटणीस अर्जूनराव सरपते यांनी केले आहे.