चोरट्यांनी कोपरगावच्या मुख्य रस्त्यावरील दोन दुकाने फोडली

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० एप्रिल २०२६ : कोपरगाव शहरातील  मुख्य रहदारी असलेल्या खंदकनाला  जवळील युवा इंटरप्राईजेस जिओ मार्ट या मोबाईल दुकानासह व समोरच असलेल्या मधू वाईन्स या  दारुच्या दुकानाचे शटरचे कुलुप तोडून चोरट्यांनी एकाचवेळी मध्यरात्री  तब्बल २ लाख ८४ हजार ७०० रुपयांचे  मोबाईल, मोबाईल साहित्य, दारूच्या बाटल्या त्यात मोबाईल दुकानातील रोख १० हजार रुपये तर मधू वाईन्स मधील रोख  २५ हजार रूपये असा अंदाजे २ लाख ८४ हजार ७०० रुपयांची  लुट करुन चोरट्यांनी पोलीसांवर आपली दहशत असल्याचे सिध्द केले आहे. 

 गुरुवारी मध्यरात्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मेन रोडवर असलेल्या दोन्ही दुकानाचे शटर अतिशय शिताफीने तोडून अद्यात चोरट्यांनी पोलीसांना अथवा सिसिटीव्ही कॅमेऱ्यांना न जुमानता  युवा इंटरप्राईजेस जिओ मार्ट मोबाईल दुकानातील  ३ पावर बॅंक, ३ एअर बट्स, २ स्मार्ट वाॅच, २ फोल्ड सेव्हन महागडे फोन, १ ट्रिमर,  व इतर अनेक साहित्यांसह १० हजार रुपये रोख रक्कमेसह चोरी केली. तर मयुर मधुकर साखरे यांच्या मधू वाईन्सचे  शटर तोडून २५ हजार रोख रक्कम, २७ हजाराची महागड्या दारुचा खंबा व इतर विविध कंपन्यांच्या दारुच्या बाटल्या चोरीन चोरट्यांनी धुमाकूळ घालून लुट केली. 

  या घटनेची खबर अभिजित द्वारकाप्रसाद  मिश्रा रा. साईसिटी, कोपरगाव यांनी शहर पोलीसांना सकाळी देताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करीत पुढील चक्रे फिरवली माञ चोरटी काही हाती लागले नाहीत. दिवसभर पोलीस शोध  घेत आहेत. या घटनेने व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply