संजीवनीच्या ९१७ विध्यार्थ्यांना  देश-परदेशात नोकऱ्या

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५/७/२०२६ : संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड अँड प्लेसमेंट विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे  विध्यार्थ्याला जपानमधील एसएमसी कंपनीत तब्बल रू ३२ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले. हा केवळ एका विद्यार्थ्याचा नव्हे, तर त्याच्या पालकांच्या स्वप्नपूर्तीचा आणि संजीवनीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभिमानास्पद क्षण आहे. अशाच  प्रकारे क्रेडने रू ३० लाख, टाॅपी इंडस्ट्रिज, जपानने रू २५ लाख, डायकिन एअर टेक्नाॅलाॅजी, जपानने रू २२ लाख, आयसीन, जपानने रू २० लाख, ओपनअप कन्स्ट्रक्शन , जपानने रू १७ लाख, अवलारा कंपनीने रू १४.५ लाख, जस्पे कंपनीने रू ११ लाख असे वार्षिक  पॅकेज देवुन नोकरीची संधी दिली. अशा  प्रकारे एकुण २०० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यानी शैक्षणिक वर्ष २०२५-२६  मधिल एकुण ९१७ विध्यार्थ्यांना  नोकरीची संधी दिली.  

आई-वडिलांची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्यांची मुले. पालक आपल्या पाल्यांचे उज्वल भविष्य घडावे या विश्वासाने त्यांना संजीवनीमध्ये शिक्षणासाठी दाखल करतात आणि संजीवनी त्या विश्वासाला यशस्वी करिअरची भक्कम साथ देते.

     एकुण २०० कंपन्यांपैकी टीसीएस, जाॅन्सन कंट्रोल्स इंटरनॅशनल पीएलसी, विसेन इन्फोटेक, फिलिप्स ग्लोबल बिझिनेस सर्विसेस, वेस्को डीजिटल इनोव्हेशन सेंटर, बाॅश  लिमिटेड, गोदरेज इन्फोटेक, महिंद्रा अँड  महिंद्रा, फाॅरेसिया, फाॅर्विस माझार्स, या कंपन्यांचा विद्यार्थी निवडीमध्ये मुख्य समावेश  आहे. या विक्रमी निवडीत काॅम्प्युटर इंजिनिअरींगच्या ११९, इन्फॉरमेशन  टेक्नाॅलाॅजीच्या १०५, मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या १५४, इलेक्ट्राॅनिक्स अँड  काॅम्प्युटर इंजिनिअरींगच्या ८५, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या ९१, सिव्हिल इंजिनिअरींगच्या ७९, मेकॅट्रॉनिक्स  इंजिनिअरींगच्या ९०, स्ट्रक्चरल इंजिनिअरींगच्या ५८ व एमबीए विभागाच्या १३६ विद्यार्थ्यांचा  समावेश  आहे.

     २०१९ पासून संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजला स्वायत्त (ऑटोनॉमस ) दर्जा प्राप्त झाल्यानंतर कॉलेजने शिक्षणाची गुणवत्ता, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि कौशल्याधारित प्रशिक्षण यांचा उत्कृष्ट संगम साधला आहे. त्यामुळे दरवर्षी विध्यार्थ्यांना  मिळणाऱ्या  नोकऱ्यांची  संख्या आणि वार्षिक वेतन पॅकेज सातत्याने वाढत आहे. प्रत्येक यशस्वी प्लेसमेंट ही केवळ एका विद्यार्थ्याची  उपलब्धी नसून, त्याच्या आई-वडिलांच्या अथक कष्टांचे, विश्वासाचे आणि आयुष्यभर जपलेल्या स्वप्नांचे साकार रूप आहे. संजीवनी प्रत्येक विध्यार्त्याच्या  यशामागे उभी राहून केवळ पदवीधर घडवत नाही, तर कुटुंबांचे भविष्य उज्ज्वल करणारे सक्षम, आत्मविश्वासी आणि जागतिक स्तरावर यशस्वी नोकरदार आणि व्यावसायिकही घडवत आहे.

    निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, डायरेक्टर आर. ए. कापगते आणि ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.


 

Leave a Reply