श्रेया डमाळे हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मीडियम  शाळेची विद्यार्थिनी  श्रेया आदिनाथ डमाळे हिने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही तिने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली होती.

    श्रेया हिने कोणत्याही शिकवणी वर्गाचे मार्गदर्शन न घेता केवळ स्वयंअध्ययन, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. तिच्या जिद्दीचे, आत्मविश्वासाचे आणि अभ्यासूपणाचे हे यशस्वी फलित मानले जात आहे.

     श्रेया ही निकमार विद्यापीठ, पुणे येथे परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले डॉ. आदिनाथ डमाळे आणि जिल्हा परिषद शिक्षिका वैशाली लोहे यांची कन्या आहे. शैक्षणिक वातावरण आणि स्वतःच्या कष्टांच्या बळावर तिने हे यश प्राप्त केले आहे.

    श्रेयाच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक के. एल. वाकचौरे, उपमुख्याध्यापिका अमृतकर, वर्गशिक्षक रणजीत खळे, महेश मोरे तसेच नगर येथील डॉ. दादासाहेब करंजुले यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्वयंअध्ययन, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या श्रेया डमाळे हिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून तिच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply