जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तालुक्यातील नेत्यांची झाली दिलजमाई

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : कोपरगाव तालुक्यातील आपापल्या मतदारांकडून मतदान करुन घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे व आमदार विवेक कोल्हेसह संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व चैताली काळे यांनी शर्थीचे प्रयत्न केले विशेषतः आमदार आशुतोष काळे यांची संपूर्ण यंञता शंभर टक्के मतदान होण्यासाठी पळापळ करीत होती.

तर आमदार विवेक कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व  जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झालेले संचालक  बिपीन कोल्हे यांनी आपल्या गटाच्या सर्व मतदारांना एकञ घेवून शक्ती प्रदर्शन करीत मतदान करण्यासाठी शहरातील एम के आढाव विद्यालयातील मतदान केंद्रावर घेवुन आल्याने येथे काळे-कोल्हे व परजणे एकञ येवून  आमदार आशुतोष काळे यांच्या  विजयासाठी एकवटल्याचे  दिसले. अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज कोपरगाव येथील दोन मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून आला. तालुक्यातील ५२९ मतदारांपैकी ५२० मतदारांनी आपला हक्क बजावला. सरासरी ९८.३० टक्के मतदान झाले. उद्या जाहीर होणाऱ्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 तालुक्याचे आमदार आशुतोष काळे हे शेतीपूरक,शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था प्रतिनिधी मतदार संघातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या विरोधीत सुधीर म्हस्के निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तालुक्यातील  ५२९ मतदारांमध्ये विविध सेवा सोसायटीचे  १०९ मतदार असुन त्यापैकी पैकी १०८ मतदारांनी मतदान केले. बिगरशेती मतदार संघातील  २४४ मतदारांपैकी २३६ तर शेतीपूरक,शेतीमाल प्रक्रिया मतदार संघातील  १७६ पैकी १७६मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

   या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांनी संपूर्ण जिल्हा ढवळून काढल्याने त्यांचा विजय  निश्चित असल्याची चर्चा आहे. आज झालेल्या मतदानामध्ये आमदार विवेक कोल्हे, संजीवनी उद्योगचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, गोदावरी दुध संघाचे चेअरमन राजेश परजणे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, नगराध्यक्ष पराग संधान, आदींसह अनेक दिग्गजांनी  मतदानाचा  हक्क बजावला. मतदान केंद्रावर  चैताली काळे ह्या  बारकाईने लक्ष ठेवून होत्या.

 दरम्यान दुपारी दोन वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मतदान केंद्र क्रमांक ९ वर विविध कार्यकारी सेवा सहकारी मतदारसंघात १०९ पैकी ९५ मतदान झाले. बिगरशेती मतदारसंघात २४४ पैकी १९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर मतदान केंद्र क्रमांक १० वरील शेतीपूरक मतदारसंघात १७६ पैकी १६६ मतदान झाले. या आकडेवारीवरून मतदानाचा उत्साह स्पष्ट झाला.

दरम्यान, आमदार आशुतोष काळे यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता असताना ऐनवेळी निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यांना संपूर्ण नगर जिल्हा पिंजून काढावा लागला. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत प्रचारासाठी विशेष प्रयत्न करावे लागले.  जिल्ह्याच्या तुलनेत कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे मतदार  काळे कोल्हे यांच्या हक्काचे आहेत त्यातच काळे कोल्हे हे एकाच पॅनमध्ये आहेत. 

संगमनेर तालुक्यात सर्वाधिक मते आहेत. माजी मंञी बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर बालेकिल्ला असल्याने  कोपरगाव व संगमनेर तालुक्यातील मतांच्या जोरावर आमदार आशुतोष काळे यांचा विजय निश्चित असल्याची आणि आता केवळ औपचारिकता बाकी असल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगली होती. दुसरीकडे  काळे,कोल्हे परजणे गटाच्या एकजुटीने या निवडणुकीतील राजकीय  गटबाजी संपुष्टात  येवून आमदार काळे संचालक म्हणून  विजयी होण्याची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.

 सहकारात राजकरणात न करण्याच्या अटीवर कोपरगाव तालुक्याचे दिग्गज नेते कायम एकवटून सहकार टिवतात. जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत बिपिन कोल्हे बिनविरोध निवडून आले, पण आमदार आशुतोष काळेंना निवडणुकीला सामोरे जावे लागले तरीही काळेंच्या विजयासाठी सर्व नेते एकवटल्याचे चिञ पहावयास मिळाले.

Leave a Reply