प्रबुद्ध भारत घडविण्यासाठी तरुणांनी सामाजिक लढा हाती घ्यावा – डॉ आंबेडकर

कोपरगाव प्रतिनिधी दि. २० : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीचा विचार, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाची स्थापना व त्यामागील उद्देश यावर सविस्तर प्रकाश टाकला. बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म हा केवळ धर्म नसून तो समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय यावर आधारलेली जीवन पद्धती आहे. घराघरात धम्म पोहचविणे तरच  बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज घडेल त्यांच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी त्यांचा राजकीय आणि सामाजिक लढा तरुणांनी हातात घेतला पाहिजे असे आवाहन येथील जाहीर धम्म परिषदेत दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी प्रतिपादन केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल व अखिल भारतीय भिख्खू संघ शहर व तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट, येथे दहा दिवसीय श्रामनेर प्रशिक्षण शिबीर समारोप व भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भत्ने बी संघपाल यांनी त्रिशरण पंचशील दिले.

यावेळी दि.बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर, चैत्यभूमीचे संचालक भदत्न बी.संघपाल,भदत्न सारिपुत्त,भदत्न आनंदसुमनसीरी, भदत्न धम्मसिरी, भदत्न कश्यप, भदत्न बुध्दवंश तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस. के.भंडारे, महाराष्ट्र राज्याध्यक्ष यू. जी. बोराडे, विश्वस्त डॉ राजाराम बडगे,राज्य सरचिटणीस अशोक केदारे, राज्य संघटक गौरव पवार, उपस्थित होते तर धम्म परिषदेचे अध्यक्ष विजय भातनकर होते तसेच संस्थेचे केंद्रीय शिक्षक मनोजकुमार मोरे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर, जिल्हा सरचिटणीस नरेंद्र पवार, कोषाध्यक्ष विश्वास जमधडे, विजय जगताप,आतिष त्रिभुवन,गौतम पगारे, संदीप त्रिभुवन, रमेश निकम आदी उपस्थित होते.

डॉ.आंबेडकर पुढे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक राजकीय विचारांवर भर देत समाजाने बाबासाहेबांचा लढा केवळ धम्मापुरता मर्यादित नसून तो सामाजिक आणि राजकीय बंड होता, जो आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्याची वेळ आली आहे. देशातील निवडणूक प्रक्रियेवरील वाढत्या अविश्वासावर चिंता व्यक्त करत ते म्हणाले की, नागरिक व विद्यार्थी रस्त्यावर उतरत असून निवडणूक आयोगावरील विश्वास उडाला आहे. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून तरूणांनी नोकरी चे मागे न लागता व्यवसायाकडे वळून
प्रगती साधावी वर्षानुवर्षे केलेल्या संघर्षानंतर आता नव्या पिढीवर आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत सर्व तरुण एकत्र येऊन लढा देत नाहीत, तोपर्यंत समाजात कोणतीही खरी क्रांती घडू शकणार नाही.

यावेळी डॉ. भिमराव आंबेडकरांच्या हस्ते आंबेडकरी चळवळीतील ५० वर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सन्मानपत्र देण्यात आले हा दिवसीय श्रामनेर प्रशिक्षण शिबीर व धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष विजय भातनकर ,सरचिटणीस
सिद्धार्थ मेहेरखांब, कोषाध्यक्ष रावसाहेब वाघ,रामनाथ जाधव ,अजय विघे ,अरुण लोढे, विलास गवळी किरण गायकवाड , हरिभाऊ चौथमल
गणेश निळे,सचिन खंडीझोड, संदीप मेहेरखांब,भिमराव काकळे,

शहर कार्यकारणी दगुजी साबळे, शहराध्यक्ष अण्णासाहेब नवगिरे, सरचिटणीस बाबासाहेब जमधडे मिलिद कोपरे ,कचरू ठोंबरे अजय पाटील रविद्र जगताप तसेच सर्व संघटक रामचंद्र ठोंबरे,हिम्मतराव भुजंग,पांडुरंग विघे, अंबादास त्रिभुवन भाऊसाहेब पगारे, प्रताप जगधने
संतोष मैंद , सिताराम मोकळ आदींनी प्रयत्न केले तर धम्म परिषदेचे सूत्रसंचालन सिद्धार्थ मेहेरखांब यांनी केले तर आभार विजय भातनकर यांनी मानले.

यावेळी डॉ. भिमराव आंबेडकरांच्या हस्ते आंबेडकरी चळवळीतील ५०वर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सन्मानपत्र देण्यात आले कालकथीत के.पी बनसोडे व्हि.एस खंडिझोड, प्रभाकर धिवर भालेराव (नाना )नारायण बनकर, बाळाभाऊ शिंदे ,नानासाहेब  जगताप तसेच आंबेडक व धम्म चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते यांनाही सन्मानपत्र देण्यात आले. मनोहर शिंगाडे.. संस्थेचे केंद्रीय शिक्षक हरिश्चंद्र फकिरा बनकर, दिपकराव गायकवाड, संपतराव  भारूड, रमाई महिला मंडळ , टाकळी नाका  

Leave a Reply