नितिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्ताने बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १५ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसा निमित्ताने राज्यस्तरीय इन्स्पायर २०२२ या भव्य बॅडमिंटन (डबल्स) स्पर्धांचे आयोजन दि. १८ सप्टेंबर रोजी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या  जीमखाना हाॅलमध्ये करण्यात येणार आहे. यात खुल्या व प्रौढ  गटात (वय वर्षे ४० किंवा ४० पेक्षा जास्त असलेले खेळाडू) जास्तित जास्त बॅडमिंटन खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कोल्हे व सचिव सुमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.


पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे की, बॅडमिंटन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या  जीमखाना हाॅलमध्ये आफ्रिकन वुडन कोर्ट व अद्ययावत कोर्टची उभारणी करण्यात आली आहे. या सुविधेचा फायदा तमाम बॅडमिंटन खेळाडूंनाही मिळावा म्हणुन विशेष करून नितिनदादा कोल्हे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधुन खुल्या व प्रौढ गटात बॅडमिंटन (डबल्स) स्पर्धांचे आयोजन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या  जीमखाना हाॅलमध्ये करण्यात आले आहे.

खुल्या गटातील विजेत्यांसाठी पहिले बक्षिस रोख रू १५००० चे असुन दुसरे बक्षिस रोख रू ७००० चे आहे. तर प्रौढ गटातील विजेत्यांना पहिले बक्षिस रू ५००० चे तर दुसरे बक्षिस रू ३००० चे आहे. खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्सच्या जीमखाना हाॅलमध्ये संपर्क साधावा किंवा ९९७५२४२९४४/७०२०३५२९४५ या भ्रमणध्वनींवर संपर्क साधावा असे आवाहन श्री कोल्हे यांनी शेवटी केले आहे.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरत शिंगी, डाॅ. प्रितम जपे, रविंद्र आढाव, छोटूभाई कोठारी आणि कोपरगांव बॅडमिंटन क्लबचे सर्व सदस्य तसेच जीमखाना प्रमुख डी. एन. सांगळे प्रयत्नशिल आहेत.