नगरपरिषदेने अवास्तव करवाढ मागे न घेतल्यास आंदोलन – संदीप वर्पे  

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगाव नगरपरिषदेने शहरातील नागरिकांच्या मालमत्तेवर केलेली अवास्तव करवाढ मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी केली असून अन्यथा आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार असल्याचा ईशारा दिला आहे. त्याबाबत कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकतेच कोपरगाव नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले आहे.

Mypage

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मागील दोन वर्षापासून पासून संपूर्ण विश्वावर कोरोना महामारीचे संकट होते. त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनने प्रत्येक घटक बाधित झाला होता. सर्वत्र आर्थिक मंदीचे सावट होते. मागील काही महिन्यांपासून कोलमडलेले जनजीवन व अर्थकारण कुठतरी पूर्वपदावर येत आहे. यापूर्वी ज्यावेळी कोपरगाव नगरपरिषदेने करवाढ करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी त्या निर्णयाला तीव्र विरोध केला होता व आजही या कर वाढीला विरोधच आहे.

tml> Mypage

कोपरगाव नगरपरिषदेने अचानकपणे करवाढ करून सर्व सामान्य नागरीकांसह छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर आर्थिक बोजा टाकलेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. एकीकडे आर्थिक स्त्रोत मंदावले असतांना दुसरीकडे करण्यात आलेली करवाढ कोपरगाव शहरवासियांसाठी मोठे आर्थिक संकट व अन्याय आहे. जर कोपरगाव नगरपरिषदेने केलेली करवाढ मागे घेतली नाही तर कोपरगाव शहरवासीयांच्या समवेत आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा देखील दिला असून वेळप्रसंगी आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर लढाई देखील लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Mypage

तसेच या करवाढीबाबत ज्या नागरिकांची हरकत असेल त्या नागरिकांसाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर मदत केंद्र सुरु केले आहे. त्या ठिकाणी नागरिकांच्या हरकती नोंदवून घेण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या हरकती नोंदवाव्यात असे आवाहन केले आहे. कोपरगाव नगरपरिषदेने नागरिकांचा अंत पाहता करण्यात आलेली करवाढ तातडीने मागे घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगूले, गटनेते माजी नगरसेवक विरेन बोरावके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. हे निवेदन कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी स्वीकारले.

Mypage

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे,कृष्णा आढाव, रमेश गवळी, दिनकर खरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, राहुल देवळालीकर, राजेंद्र खैरनार, अशोक आव्हाटे, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, आकाश डागा, 

Mypage

इम्तियाज अत्तार, ऋषिकेश खैरनार, शुभम लासुरे, नितीन शिंदे, एकनाथ गंगुले, प्रशांत वाबळे, शिवाजी कुऱ्हाडे, बाळासाहेब शिंदे, महेश उदावंत, गणेश बोरुडे, किशोर डोखे, सचिन गवारे, योगेश नरोडे, फिरोज पठाण, किरण बागुल, मीराताई साळवे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र जोशी, शफिक शेख, रविंद्र वाघडकर, दादा पोटे, अक्षय आंग्रे, मनोज नरोडे, सागर विदुर, चांदभाई पठाण, अक्षय पवार, सुरेंद्र सोनटक्के, संतोष दळवी, अभिषेक मगर आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage