संजीवनी एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकऱ्या – अमित कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी एमबीएच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाच्या प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधिल अंतिम वर्षातील १०० टक्के विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्या व आस्थापनांमध्ये वार्षिक पॅकेज रू ७. ५  लाखांपर्यंतच्या नोकऱ्या मिळवुन देण्यात यश आले आहे. सरासरी पॅकेज रू ३. ५ लाखांचे आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे की, पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स, नो ब्रोकर्स, फिन्डेस्टिनेशन, पीएचएन टेक्नॉलॉजिज, सिटी युनियन बॅन्क, कोटक बॅन्क, आयसीआयसीआय एएमसी, ओम लॉजिस्टिक्स, गती लॉजिस्टिक्स, अशा एकुण ५५ नामांकित कंपन्या, बॅन्क्स, आस्थापने यांनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखती घेवुन १०० टक्के विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नोकरीचे पत्र दिले. सध्या एमबीए मधिल फायनान्स, मार्केटींग, एचआर, ऑपरेशन्स, ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट, अशा स्पेशलायझेशनचे शिक्षण दिले जात आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९ पासुन संजीवनी एमबीए ने ऑटोनॉमस दर्जा प्राप्त केल्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या, बॅन्का व आस्थापने यांना अभिप्रेत असणारे व्यवस्थापन कौशल्ये व ज्ञानाचा अभ्यासक्रमात अंतर्भाव केलेला असल्यामुळे संजीवनी एमबीए चे उत्कृष्ट व्यवस्थापन विद्यार्थ्यांची ज्ञानाधिष्ठित प्रथम पसंतीने नोकऱ्यांसाठी निवड झाली. सध्या एमबीएच्या १२०  जागा असुन संजीवनी मध्येच एमबीए शिक्षण घेणाऱ्यांची  संख्या मोठी असुन दरवर्षी  इच्छुकांना प्रवेश  क्षमतेची मर्यादा असल्याने अनेकांना संजीवनी मध्ये प्रवेश  मिळत नाही. म्हणुन व्यवस्थापनाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून  एमबीए संलग्न संस्थांची परवानगी शैक्षणिक वर्ष  २०२३-२४ पासुन प्राप्त केली आहे.

संजीवनी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अंतर्गत १२० प्रवेश क्षमतेत फायनान्स, मार्केटींग, एचआर, ऑपरेशन्स, इंटरनॅशनल मॅनेजमेंट, रूरल अँड ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट, फार्मा अँड  हेल्थ केअर मॅनेजमेंट व टुरिझम अँड  हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अशा स्पेशलायझेनचे शिक्षण  देण्यात येणार आहे. तसेच संजीवनी बिझिनेस स्कूल अंतर्गत पोस्ट ग्रॅज्युएट डीप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम) या स्पेशलायझेषनसाठी ६० जागांची प्रवेश क्षमता आहे. यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद  (एआयसीटीई) यांनी मान्यता दिली आहे. पीजीडीएम अंतर्गत बिझिनेस अनॅलिटिक्स, डीजीटल मार्केटींग, फॅमिली बिझिनेस मॅनेजमेंट या मधिल स्पेशलायझेशन देण्यात येणार आहे, असे कोल्हे शेवटी म्हणाले.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधिल सर्व एमबीए शिक्षण पुर्ण केलेल्या व नोकऱ्या मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच डायरेक्टर ए. जी. ठाकुर, एमबीए विभाग प्रमुख विनोद मालकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन विशाल तिडके व एमबीए विभागाचे समन्वयक प्रा. प्रकाश  मनोहरन यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले.