जिजाऊ व शिवराय हे राष्ट्राला आकार देण्यासाठी जन्माला आले होते – विश्वासराव पाटील

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : राष्ट्रमाता जिजाबाई आणि छञपती शिवाजी महाराज हे आपल्या भारत भुमीत राष्ट्राला आकार देण्यासाठी जन्माला आले होते. छञपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज व पानिपतची लढाई  यांच्या बद्दल चुकीचा इतिहास सांगितला गेला आहे तो आपण उलट तपासुन पाहीला पाहीजे असे मत प्रसिद्ध व्याख्याते विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केले.

कोपरगाव येथील समता चॅरीटेबल ट्रस्ट आणि सोनतारा भनसाळी ट्रस्ट आयोजित स्व. धनराजजी मिश्रीलालजी भनसाळी व्याख्यानमाला पुष्प ६ वे.  महाराष्ट्राचा धगधगता इतिहास ‘छञपती शिवराय ते पानिपत’ या विषयावर प्रसिद्ध  व्याख्याते व पानिपतकार विश्वासराव  पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन शहरातील कलश मंगल कार्यालयात करण्यात आले होते.

याप्रसंगी यावेळी विश्वासराव पाटील बोलत होते. या व्याख्याच्यावेळी सोनतारा ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद भनसाळी, उपाध्यक्ष संजय भनसाळी, संयोजक राजकुमार बंब, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन  राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, सुहासिनी कोयटे, तुलशिदास खुबानी, कोपरगाव तालुका विकल संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजी खामकर, ॲड. शंतनु धोर्डे, ॲड. अशोक टुपके, ॲड. नितीन पोळ, ॲड.विजय गवांदे, व्यापारी महासंघाचे सचिव  सुधीर डागा, अभिनंदन भनसाळी शरद ञिभुवन, स्वाती कोयटे यांच्यासह विविध क्षेञातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले, राष्टासाठी जगावे कसे हे छञपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकावे तर  राष्ट्रासाठी मरावे कसे हे  छञपती संभाजी महाराज यांच्याकडून शिकावे. शिवाजी महाराज यांचे कार्य सुर्यासारखे तेजस्वी आहे म्हणुनच   आकाशातुन विजसुधा अनेकवेळा छञपती शिवाजी महाराज यांच्या रायगड येथील समाधीवर पडत असते. कारण एका तेजस्वी विरपुरुषाच्या समाधीला नभातुन मुजरा करुन जाते. 

पानिपतच्या भूमीतील माती म्हणजे पंढरीची माती वाटते. त्या मातीत मराठ्यांच्या शौर्याची गाथा आहे. विरतेचे प्रतिक आहे.  दत्ताची शिंदे यांच्या मुखातुन बचेंगे तो और भी लढेंगे ही  म्हण सर्वप्रथम मराठ्यांची ललकारी होती. पानिपतच्या मैदानावर लढणाऱ्यापैकी यशवंतराव पवार हे या कोपरगावच्या मातीतले होते.पानिपतची लढाई ही मुस्लीमाविरुध्द नव्हती तर ती परकीया विरोधात होती. पानिपतच्या लढाई बद्दल चुकीचा इतिहास सांगितला गेला. या लढाईत मुस्लीमांसह सर्व जाती धर्मातील लढवय्ये मराठ्यांच्या बाजुने लढत होते.

निसर्गाने साथ दिली नाही. तळपत्या सुर्याच्या किरणा बरोबर  चार दिवस उपासपोटी लढणाऱ्या मराठे भोवळ येवुन पडले. वेळेच्या नियोजनाच्या अभावामुळे पानिपतच्या लढाईत अखेरच्या क्षणी पराभाव झाला. शञुच्या छातीत धडकी भरवणारी ही पानिपतची लढाई पराभव झाला तरी मराठ्यांची विरगाथा सांगणारी अमर कहानी आहे. चुकीचा इतिहास रंगवला असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.‌जिथे माझ्या धन्याचा  जोडा पडेल तिथेच माझ्या देहाचा तुकडा पडेल अशी धारणा असणारे इमानदार माणस त्याकाळी जोडली होती असे म्हणत मराठे शाहीची शौर्यगाथा आपल्या खास शैलीतुन व्याख्याते विश्वासराव पाटील सांगताना उपस्थित जनसमुदाय मंञमुग्द होवून ऐकत होता.

या व्याख्यानाच्या वेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे बोरताना म्हणाले. अवघ्या दिडवर्षात तालुक्यातील  काकडीच्या  विमानतळच्या काला आराखडा तयार करुन विश्वासराव पाटील यांनी कामाला सुरुवात केली याचा अभिमान वाटतोय. नेहमी बोलताना पानिपत झाले असं बोललं जाते पण नेमकं पानिपत काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे अशी अपेक्षा कोयटे यांनी व्यक्त केली.

ज्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी हि व्याख्यानमाला सुरु केले ते स्वतः आपल्या हयातीत व्याख्यानमाला सुरू केली होती म्हणून त्यांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी दर वर्षी हि व्याख्यानमाला सुरु करण्यात आली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुजा भनसाळी यांनी भनसाळी कुटुंबाने व्याख्यानमाला सुरु करण्यामागचा उद्देश व या व्यानमालेला सहकार्य करणाऱ्यांचे शब्दसुमनाने कौतुक केले.कार्यक्रमाचे सुञसंचलन व उपस्थितांचे आभार राजकुमार बंब यांनी व्यक्त केले.