भोईराज मंडळाने घडवले साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन

शेवगाव प्रतिनिधी, दि.३० शेवगांवच्या मुख्या बाजारपेठेत भोईराज पंच मंडळाने तुळजापूरच्या देवीची प्रतिष्ठापना केली असून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ माहूरगडची रेणुकामाता, कोल्हापूरची जगदंबा माता, तुळजापूरची भवानी माता आणि वणी शप्तशृंगी माता यां सर्व देवीच्या दर्शनाचा देखावा उभारला आहे.

     बाजारपेठेच्या मेनरोडवर भव्य सोनेरी प्रवेशद्वार उभारले असून  सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई करुन त्यात किमती झुंबर लावले आहेत. भोईराज तरुण मंडळाला १२७ वर्षाची परंपरा आहे.

माजी नगरसेवक दिगंबर काथवटे सामाजिक कार्यकर्ते ईश्वरसेठ गुणवंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. जगन्नाथ कांबळे, कैलास काटकर आणि स्व अरुण लांडगे यांच्या शुभाशीर्वादाने मंडळाचे अध्यक्ष रोहित काथवटे यांच्यासह  सुरेश हुशार, किरण भोकरे, दिलीप कांबळे, किशोर काथवटे , किरण काथवटे ,मनोज कांबळे, कमलेश लांडगे, अमोल घोलप ,संजय शिनगारे, बाळासाहेब काटकर आदि कार्यकर्ते  मंडळासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यात महिलाही  सहभागी असतात.

        प्रसाद कांबळे, सिद्धार्थ शिनगारे, रोहन शिनगारे अभिषेक गवते, महेश गवते, आकाश भोकरे,अमोल शिनगारे, साई पटेल,राहुल शिनगारे, यांनी रात्र दिवस एक करून देखावा सादर केला प्रसाद कांबळे, सिद्धार्थ शिनगारे, किरण भोकरे, रोहन शिनगारे अभिषेक गवते, महेश गवते, आकाश भोकरे,अमोल शिनगारे, साई पटेल, राहुल शिनगारे, यांनी रात्र दिवस एक करून देखावा सादर केला .