शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप कीपर्स फेडरेशन पुणे प्रणीत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील मीनाताई कळकुंबे यांची नुकतीच निवड करण्यात आली. एका सुशिक्षीत आणि धडाडीच्या माहिलेची स्वस्त धान्य ( रेशन ) दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्द्ल त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात एकूण एक हजार ८५२ स्वस्त धान्य दुकाने असून या व्यावसायिकांना प्रशासन आणि सामान्य लाभार्थी यांच्यामधील दूवा म्हणून काम करावे लागते. अनेक त्रुटीतून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे प्रसंगी रोषाचे धनी व्हावे लागते. तेव्हा संघटनेला सर्वांना सांभाळून घेऊन काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज होती. मिनाताई कळकुंबे मुळातच सामाजिक कार्यकर्त्या असल्याने त्यांची जिल्हाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल ‘ योग्य जागी योग्य व्यक्ती ‘ अशी भावना अनेकांनी व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे.