मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनास उपस्थित राह्ण्याचे सचिव शिवाजी लावरे यांचे मुख्याध्यापकांना आवाहन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी कोपरगांव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा संपन्न झाली. या मध्ये अहमदनगर येथे संपन्न होणाऱ्या ६१व्या मुख्याध्यापक संघाच्या राज्य अधिवेशनाला कोपरगांव तालुका व शहरातील सन्माननिय प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी उपस्थित रहावे आणि अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजीराव लावरे यांनी केले आहे. 

या सहविचार सभेत सर्वाचे स्वागत मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.  सर्वानी राज्य अधिवेशनास उपस्थित रहावे आपल्या संघटनेचे ताकद दाखुन द्यावी असे मत मुख्याध्यापक प्रकाश देशमुख यांनी मांडले. नवीन मुख्याध्यापक म्हणुन काम करतांना खुप अडचण होते त्यासाठी अशी अधिवेशनात सर्वानी सहभागी झाले पाहीजे असे विचार मुख्याध्यापिका सौ. सुनिता पारे यांनी मांडले. श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे उपमुख्याध्यापक श्री.आर.बी.गायकवाड यांनी आभार मानले. या सहविचार सभेला जिल्हा व तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व विविध शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.