कोपरगाव प्रतिनधी, दि. १४ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष तर्फे महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशाबाबत पहिली यादी जाहीर झाली असून श्रीगणेश शिक्षण संस्थेच्या ३ विद्यार्थ्यांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात निवड झाली. तसेच ८४ विद्यार्थ्यांची विविध निमशासकीय व ऑटोनॉमस अभियांत्रिकी महाविद्यालयात निवड झाली,अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी पत्रकारांना दिली.
कोविड प्रकोपानंतर एकाच वेळी ३ विद्यार्थ्यांची शासकीय महाविद्यालयासाठी निवड झाली. यापैकी शुभम राजेंद्र येलमामे आणि दुर्गेश बाळासाहेब माळी यांची कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, ओम विलास शेटे याची श्री गुरु गोविंद सिंगजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग नांदेड या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात निवड झाली. एकूण 84 विद्यार्थ्यांची नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात निवड झाली. यामध्ये आशिष थोरात, प्राजक्ता शहाजी सातव, अलिशा दादासाहेब सपकाळ, अजित सुभाष पवार, सानिया पीर मोहम्मद मणियार, कौस्तुभ ज्ञानेश्वर लोंढे, अक्षदा रावसाहेब खालकर, ऋतिक विजय जामदार, आदित्य दादासाहेब जाधव, प्रणव दादासाहेब ढमाले, उदय विकास गाडे, मंगेश रामचंद्र दळवी, मिताली मनोज बोबडे, वसुंधरा प्रशांत बावके, प्रणव शिवाजी बर्गे, शिल्पा राहुल लांडगे, मकरंद विजय लोंढे, मृणाली सुनील पाळंदे, ईश्वरी अनिल सावळा, तन्मय संजय ठाणगे, विराज बाबासाहेब बडवर, सनया सुर्डे, रामेश्वर जाधव, साईराज धमाळ,संकेत खुळे यांसारख्या विद्यार्थ्यांची पहिल्याच फेरीमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात निवड झाली.
अभियांत्रिकी प्रवेशाबाबत श्री गणेश शिक्षण संस्थेचा आलेख उंचच उंच वाढत आहे.जिद्द,चिकाटी व सातत्य यांचा उत्तम संयम साधल्याने अपेक्षित असे यश मिळवता येते याचे उत्तम उदाहरण श्री गणेश संस्थेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी समाजासमोर ठेवलेले आहे. विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध ज्ञान घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.भविष्यात आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन हे विद्यार्थी विविध क्षेत्रात स्वतःचे, पालकांचे व देशाचे नाव उज्वल करतील,अशी प्रतिक्रिया प्रा.विजय शेटे यांनी व्यक्त केली.
कोऱ्हाळे सारख्या गावामध्ये उच्च प्रतीचे अभियांत्रिकी, वैद्यकीय व औषध निर्माण शास्त्र प्रवेश पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण “श्री गणेश संस्थेने “देणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या पाल्याचा फक्त दहा हजार रुपये फी भरून नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश झाला.श्री गणेश शिक्षण संस्थेच्या “श्री गणेश पॅटर्नचे” हे यश आहे. – राजु चंदर कोळगे (पालक)