कोपरगांव प्रतिनिधी, दि. २१ : औरंगाबाद येथे नुकत्याच राज्यस्तरीय सब ज्युनिअर साॅफ्टबाॅल स्पर्धा संपन्न झाल्या. यात राज्यभरातुन आलेल्या विविध संघांतील खेळाडूंमधुन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणारे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या संघासाठी निवडण्यात आले.
यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा इ.९ वी तील खेळाडू ओम पंकज पाटील याची निवड झाली असुन ग्रामिण भागातील खेळाडू संजीवनीच्या माध्यमातुन महाराष्ट्राचे नेतृत्व करणार असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, या निमित्ताने ओमला संजीवनी इंटरनॅशल स्कूलचे नाव देशाच्या क्रीडा पटलावर झळकविण्याची संधी प्राप्त झाली आहे, अशी माहीती स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांनी देशाच्या शैक्षणिक पटलावर दर्जा व गुणवत्तेच्या जोरावर आपले नाव कोरले आहे. यातीलच शिर्डी येथे शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मध्ये सुरू केलेल्या सीबीएसई पॅटर्नच्या डे बोर्डींग सुविधा असलेल्या संजीवनी इंटरनॅशनल स्कूलने विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत मुसंडी मारली आहे. ओम पाटीलची राज्याच्या संघात निवड ही याबाबतची पुष्टी मानल्या जाते.
आता राष्ट्रीय पातळीवरील सब ज्युनिअर साॅफ्टबाॅल स्पर्धा आंध्रप्रदेश मध्ये कर्णुल येथे खेळल्या जाणार आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राला विजश्री खेचुन आणायच्या जिध्दीने ओम संजीवनीचे राष्ट्रीय कोच विरूपक्ष रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याच्या भावी वाटचालीसाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व स्कूलच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
‘माजी मंत्री व संजीवनी ग्रुपचे संस्थापक कै. शंकरराव कोल्हे यांचे नेहमी आम्हाला मार्गदर्शन असायचे की, पालक ज्या विश्वासाने त्यांच्या पाल्यांना स्कूलमध्ये दाखल करतात, त्यांच्या विश्वासाला आपण सार्थ ठरलो पाहीजे. त्यांच्या शिकवणीनुसार व्यवस्थापनाने स्कूल मध्ये अनुभवी उच्च शैक्षणिक अर्हता तसेच संगीत, क्रीडा, आदी क्षेत्रातील प्रशिक्षक नेमले आहेत आणि सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे अल्पावधीमध्ये या स्कूलने नावलौकिक प्राप्त केला आहे.’-डाॅ. मनाली अमित कोल्हे, संचालिका, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स