तालुक्यातील १ हजार ३२३ शेतक-यांना अनुदानाचा लाभ – विवेक कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ : कोपरगांव तालुक्यातील १ हजार ३२३ शेतक-यांनी नियमीत कर्जफेड केल्याबददल त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचे अनुदान जाहिर केले असुन सदरची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर तात्काळ जमा होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.

कोल्हे पुढे म्हणाले की, कोपरगांव तालुक्यात ७ हजार ४७७ कर्जदार शेतक-यांपैकी १ हजार ३२३ शेतक-यांनी नियमित शेती कर्ज भरले असुन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. सदर कर्जदार शेतक-यांना पन्नास हजार रूपयांचे अनुदान रक्कम मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला होता.