शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : अहमदनगर येथे २२ फेब्रुवारीला होणाऱ्या जागतिक पातळीच्या अहमदनगर सायक्लोथान राइटच्या प्रचार व प्रसारासाठी शेवगाव ते साकेगाव अशी सकाळी ६ वा. शेवगावच्या शेकडो सायकल स्वारांनी अहमदनगर सायकल क्लबचे चंद्रशेखर मुळे यांच्या उपास्थितीत डॉ. भागीनाथ काटे, डॉ. संजय लड्डा, वसंत सुरवसे, यांनी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सायकल रॅली काढली. यावेळी भारत माता व छात्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला.
डॉ. योगेश फुंदे , डॉ.दिपक वैद्य, डॉ.श्रीकांत देवढे यांनी झेंडा फडकावताच रॅलीला सुरुवात झाली. साखर झोपेत असलेले शेवगावकर जयघोषांच्या आवाजाने जागे होवून राईड पाहण्यासाठी घरा बाहेर आले. सायकल स्वार थोर पुरुषांच्या व भारतमातेच्या नामांचा जयघोष करीत असल्यामुळे रॅलीला एक वेगळाच रंग आला. रॅलीला साकेगाव यु टर्न घेवून मागे फिरली. युटर्न पाँईट वर पाणी, चक्की, एनर्जी उत्तेजक पेय ठेवण्यात आली होती.
रॅलीत महिला सायकलस्वारांची उपस्थिती उल्लेखनीय होती. युटर्न पाँईट वर फोटो शुट करण्यात आले. रमत -गमत राईडचा आनंद घेत राई ड नियोजित ठिकाणी साडे आठ च्या दरम्यान पोहोचली. प्रथम सर्व सहभागी सायकल स्वारांना टी शर्ट चे वाटप करण्यात आले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली . अध्यक्ष विनोद ठाणगे यांनी शेवगाव सायकलचा इतिहास सांगितला. डॉ. संदिप बोडखे यांनीं सायकल क्लबच्या पुढील वाटचालीबाबत सविस्तर माहिती दिली . अहमदनगर सायकल असोसिएशनचे अध्यक्ष मुळे, प्रवक्ते रविद्र पत्रे, सीए रवींद्र दरेकर यांचा शेवगाव सायकल कल्बच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच शेवगाव क्लब च्या ज्या सायकलपटूंनी नुकताच S. R हा बहुमानाचा किताब. विजेत्या जिल्हयातील पहिल्या महिल डॉ. सौ . स्मिता उगले तसेच, डॉ . प्रदिप उगले, डॉ. मुकुंद दारकुंडे, निलकंठ लबडे, आबासाहेब नेमाने, संजय बडे, बंडू दहातोंडे आणि सुभाष पवार यांचा अहमदनगर सायकल क्लब च्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच शेवगावात गेल्या दहा वर्षापासून सायकल चालवत असलेले डॉ. सौ. मनिषा लड्डा व डॉ. संजय लड्डा यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. संदिप बोडखे, संतोष भागवत, प्रा.राम नेवल, भारत दहिवाळकर, लक्ष्मण बिटाळ, दुर्गेश काथवटे, नितीन पवार, डॉ. शिल्पा देहाडराय, वल्लभ लोहिया, प्रा.डॉ .गजानन लोंढे, प्रा.मच्छिंद आधाट प्रशांत सुपेकर, विनोद शेळके, तुकाराम बुळे, प्रा.राम नेव्हल, प्रदिप बोडखे , डॉ.मयुर लांडे या सायकल कल्बच्या सदस्यांनी सहभाग घेतला. कैलास जाधव यांनी सूत्रसंचालन केले. गवळी यांनी आभार मानले.