दिंडी सोहळयातुन अध्यात्म संस्काराचा ठेवा – रमेशगिरी महाराज 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १ : साईबाबा अध्यात्मातील पराकोटीचे संत होते, त्यांनी सर्वधर्मसमुहाला एकतेची शिकवण दिली, सबका मालिक एक हा नारा संपुर्ण विश्वात पसरविला, देश विदेशातुन साईबाबांच्या शिर्डीत येणा-या पायी दिंडी सोहळयातुन अध्यात्म संस्काराचा ठेवा याबाबतची शिकवण मिळते असे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख विश्वस्थ प. पू. रमेशगिरी महाराज यांनी केले. 

            सालाबादप्रमाणे याही वर्षी संवत्सर येथे कन्नड तालुक्यातील कानडगांव येथुन रमेश नलावडे संचलित साईपालखी मंगळवारी मुक्कामी होती त्याचे पुजन जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते. पालखीचे यंदा अकरावे वर्ष होते. प्रारंभी वृत्तपत्र छायाचित्रकार दत्तात्रय व दिपाली गायकवाड या उभयतांनी स्वागत करून संत पुजन केले. गानसम्राट अरुणभैय्या पगारे यांनी बहारदार भजनसेवा सादर केली. 

              याप्रसंगी सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक बाळासाहेब वक्ते, अरूणराव येवले, शिवाजीराव वक्ते, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, उपसरपंच विवेक परजने, दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष मुकूंद काळे, श्री विठठल रूक्मीणी देवस्थानचे सुदामराव साबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे, पावन हनुमान व ओम साई मित्र मंडळाचे सर्व सहकारी, विणावादक सोमनाथ नलावडे, रमेश नलावडे, संतोष नलावडे, ज्ञानेश्वर नलावडे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी भाविक तसेच खडोबा, विठठल रुक्मीणी, श्रीराम व शृंगेश्वर भजनी मंडळाचे सर्व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. 

           प. पू. रमेशगिरी महाराज पुढे म्हणाले की, कोपरगांव ही संतांची ऐतिहासिक पावनभूमी असून दक्षिणगंगा काशि म्हणून गोदावरीचा नदी काठ अत्यंत पवित्र आहे., अनेक संत म्हणताना या ठिकाणी तपश्चर्या केल्या आहेत. प्रभू श्रीरामचंद्र, सितामाई, लक्ष्मण यांच्या १४ वर्षे दंडकारण्य वनवासाच्या ऐतिहासिक पाऊलखुणा संवत्सर कोकमठाण पंचक्रोशीला लाभलेल्या आहेत.

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी ज्या कोपरगांव बेट भागासह अन्य ठिकाणी श्रमदानातुन महादेव मंदिराची उभारणी केली ही मंदिरे अध्यात्म उर्जेची ठिकाणे तयार झाली आहेत. पायी दिंडी आणि त्यातून होणारा नजर ही साईबाबांची अलौकीक भक्ती तुम्हा आम्हाला सतत अध्यात्माची आठवण करून देते. शेवटी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यांत आले. छायाचित्रकार दत्तात्रय गायकवाड यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी अन्नदानासाठी आर्थीक मदत दिली.