सौ. विमल पुंडे – जिल्हाप्रमुख शिवसेना महिला आघाडी
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला निवडणूक आयोगाकडून शिवसेना व धनुष्यबाणाचा आलेला निकाल हा शिवरायांचा आणि परमेश्वराचा प्रसाद आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद म्हणून आम्ही शिवसैनिक या निकालाचे स्वागत करत आहोत.
शिवसैनिक हाच खरा शिवसेनेचा प्राण आहे. तो आहे म्हणून शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक हाच खरा या शिवसेनेचा वारसदार आहे. बाळासाहेबांनी सांगितले होते की नावाला जपा. पैसा येईल पैसा जाईल पण एकदा नाव गेले की ते परत येत नाही. परंतु हा विचार फक्त बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसैनिकांनी जपला. म्हणूनच शिवसेनेच्या बाजूने आजचा हा निकाल लागला आहे.
शिवसेनेवर खरा हक्क हा शिवसैनीकांचा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निकाल देऊन स्पष्ट केले आहे. आता शिवसैनिक हा पक्षाचा विचार देशभरात घेऊन जातील. असे मनोगत शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. विमल पुंडे यांनी शिवसेना धनुष्यबाण निकालावर आपली प्रतिक्रिया देताना व्यक्त केले. आणि सर्व शिवसैनिकांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. निकालाचे स्वागत केले आहे.