छत्रपतींचे जीवनचरित्र जागतिक दिपस्तंभ – बिपीनदादा कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, १९ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र जागतिक दिपस्तंभ असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. शिवजयंती निमीत्त शहरातील मुख्य रस्त्यावरील अश्वारूढ शिवाजी पुतळ्यास संजीवनी उद्योग समूह, कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

कोल्हे पुढे म्हणाले की, रयतेचे सुराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले. अष्टप्रधान मंडळाचे माध्यमातून त्यांनी रयतेला सुखी केले. छत्रपती शिवाजी महाराज हे व्यवस्थापन शास्त्रात अत्यंत निपुण होते. व्हिएतनामचे राष्ट्रप्रमुख हो-चि- मिन्ह यांच्यापासून भारताचे अष्टपैलु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांनीच शिवप्रेरणा घेतली आहे. आपण सगळे या राष्ट्रपुरुषाची जयंती साजरी करतो हे मोठे भाग्य आहे.

            याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वासराव महाले, बापुसाहेब बारहाते, बाळासाहेब वक्ते, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, गटनेते रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, बबलूशेठ ऊर्फ नयनकुमार वाणी, रिपाई नेते दिपक गायकवाड, जितेंद्र रणशूर, स्वप्निल निखाडे, जनार्दन कदम, विवेक सोनवणे, अशोक लकारे, रवींद्र रोहमारे, दीपक जपे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष आविनाश पाठक, प्रसाद आढाव, जगदीश मोरे, गोपी गायकवाड, किरण सुपेकर, जयप्रकाश आव्हाड, खलिकभाई कुरेशी,

अकबरलाला शेख, संतोष साबळे, सतीश रानोडे, चंद्रकांत वाघमारे, विष्णुपंत गायकवाड, विजय गायकवाड, शफिक सय्यद, आसिफ शेख, सचिन सावंत, अनिल गायकवाड, विजय चव्हाणके, रुपेश सिनगर, वसीम पटेल, शंकर बिऱ्हाडे, रामचंद्र साळुंके, सतीश चव्हाण, अर्जुन मरसाळे, सागर जाधव, अल्ताफ कुरेशी, गोपीनाथ सोनवणे, मुक्तार शेख, नीलेश डोखे, ज्ञानेश्वर जाधव, रोहन दरपेल, सलीम पठाण, योगेश शिरसे, फकीर मोहम्मद पहिलवान यांच्यासह विविध संस्थांच्या आजी माजी पदाधिकारी आदींसह भारतीय जनता पक्ष, भाजयुमो, संजीवनी उद्योग समूह संलग्न संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवभक्त, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.