श्री साईगाव पालखीचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते विधिवत पूजन  

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी उत्सव साजरा करून दरवर्षी प्रमाणे श्री साईगाव पालखी व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त कोपरगाव शहरातून शिर्डीला जाणाऱ्या श्री साईगाव पालखीची विधिवत पूजा आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी आ. आशुतोष काळे हे देखील श्री साईगाव पालखी सोहळ्यात सहभागी झाले यावेळी त्यांनी श्री साई पालखीतील सहभागी हजारो साई भक्तांना श्रीरामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.

Mypage

कोपरगाव शहरासह कोपरगाव तालुक्यात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी अनेक ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव साजरा करून धार्मिक कार्यक्रमात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला. श्रीराम नवमी निमित्त दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोपरगाव शहरातून शिर्डी येथे श्री साईगाव पालखी काढण्यात आली.

Mypage

या पालखी सोहळ्यात आ.आशुतोष काळे यांनी सहभाग घेवून भक्तांचा उत्साह वाढविला.यावेळी मोठ्या संख्येने साई भक्त श्री साईगाव पालखी सोहळ्यात सहभागी झाले यावेळी श्रीराम व श्री साईंच्या गजरात श्री साईगाव पालखी शिर्डीला श्री साईंच्या भेटीला निघाली.

Mypage

तसेच श्री साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव येथे श्री साईसच्चरीत पारायणाच्या सांगता सोहळ्या प्रसंगी  ह.भ.प. सर्जेराव महाराज टेके यांच्या काल्याच्या किर्तनाचा आ.आशुतोष काळे यांनी लाभ घेतला. उपस्थित भक्तांना आ. आशुतोष काळे यांनी महाप्रसाद वाढण्याची सेवा दिली.

Mypage

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे देखील सालाबाद प्रमाणे रामवाडी या ठिकाणी श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याठिकाणी देखील आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित भाविकांना पंक्तीमध्ये महाप्रसाद वाढला. यावेळी संवत्सर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage