कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : केंद्रीय तपास यंञणांचा गैरवापर करुन विरोधकांना लक्ष केले जात आहे. तसेच विरोधी राज्यातील सत्ताधाऱ्यांना राज्यपालांच्या माध्यमातुन हस्तक्षेप करीत आडकाठी आणले जात असल्याने केंद्रीय तपास यंञणांचा गैरवापर थांबवावा यासाठी देशातील प्रमुख ९ विरोधकांच्या सहीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पञ देण्यात आले असल्याची माहीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
त्या संदर्भात माजी मंञी बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली असता त्यावर ते म्हणाले, सत्तेच्या माध्यमातून केंद्रीय तपास यंञणांचा गैर वापर करुन विरोधकांवर सुड बुद्धीने कारवाई करण्यास भाग पाडले जाते हे उघड सत्य आहे. हे आता कुठेही लपुन राहीले नाही. केवळ आमच्यासारख्या नेत्यांनाच हा प्रश्न काय विचारता अगदी गाव खेड्यातील पारावरावच्या सामान्य माणसाला जरी विचारले तरी ते सुध्दा सांगतील की, देशातल्या स्वायत्त संस्था अर्थात तपास यंञणा कुणाच्या सांगण्यावरून काम करतात. कशी कारवाई करतात किंवा कोणावर कारवाई करतात.
सत्ताधाऱ्याकडून केंद्रीय तपास यंञणांचा गैरवापर केला जातो हे आता कुठेही लपुन राहीले नाही असे परखड मत राज्याचे माजी महसूलमंत्री व काॅंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केले. कोपरगाव येथील जेष्ठ नेते स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त्याने कार्यक्रमाला बाळासाहेब थोरात आले होते यावेळी माध्यम प्रतिनिधींनी विचारले की, केंद्रीय तपास यंञणांचा सत्ताधारी गैरवापर करीत आहे का? यावर बाळासाहेब थोरात यांनी वरील उत्तर देवून सत्ताधाऱ्यांवर निशाना साधला.
केंद्रात आणि राज्यात केंद्रीय तपास यंञणांच्या माध्यमातुन विरोधकांना सुडबध्दीने आडकावण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. ईडी, सीबीआय सह इतर यंञणांनी आजपर्यंत केलेल्या अनेक कारवाईतुन विरोधकांना लक्ष केल्याचे उघड होत आहे. तसेच संबधीत व्यक्तीने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला क्लिनचीट दिली जाते. या तपास यंञणांच्या कारवाईवर सर्व सामान्य नागरीक चकीत होत आहे अशीच भावना थोरात यांनी व्यक्त करीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत केंद्रीय तपास यंञणावर संशय व्यक्त केला.
सर्व चोर एकञ आले तरी चौकीदार सक्षम आहे – डॉ. सुजय विखे पाटील ….. दरम्यान या संदर्भात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा केली असता. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, जे राजकीय नेते आता विरोधात बसले आहेत त्यांना कोणत्याही तपास यंञणेने विरोधात बसवले नाही. तर त्यांच्या राज्यातील, जिल्ह्यातील व तालुक्यातील जनतेने विरोधात बसवले आहे. विरोधी पक्ष कोण व्हावा हे जनता ठरवते तपास यंञणा ठरवत नाही. सध्याचे जे विरोधक आहेत ते सत्तेत असताना केलेल्या भ्रष्टाचारामुळे जनतेने त्यांना विरोधात बसवले. आणि आता त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होत आहे. आपलं उघड पडू नये म्हणून सर्व विरोधक एकञ झाले आहेत. जरी सर्व चोर एकञ झाले तरी देशाचा चौकीदार तितक्याच सक्षम पध्दतीने काम करणार आहे. असे म्हणत देशासह राज्यातील विरोधकांना विखे यांनी चांगलाच टोला लगावला आहे.