माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आठवणीनिमीत्त छान सुविचार पुस्तकाचे प्रकाशन

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ६: माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे लढवय्ये नेते होते. जिदद, कार्यकर्ते हीच त्यांची उर्जा होती त्यांच्या आठवणीनिमीत्त छान सुविचार पुस्तकाचे प्रकाशन श्रीमती सिंधुताई शंकरराव कोल्हे उर्फ माई, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, डॉ. मिलींदराव कोल्हे, ज्येष्ठनेते दत्तात्रय कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमितदादा कोल्हे, आदिंच्या हस्ते रविवारी संजीवनी अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या मैदानावर थेट जनतेमध्ये करण्यांत आले.

स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रथम पुण्यस्मणदिनाचे औचित्य साधुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे कर्मचारी, संवत्सर येथील रहिवासी वीरेंद्र मधुकर जोशी यांनी विविध स्त्रोत संकलनातुन, व्यक्तीगत विचारातुन तयार केलेल्या असंख्य विचारांचे छान सुविचार पुस्तक तयार करून त्यांना अर्पण केले. या पुस्तकाचे मुखपृष्ठ सर्वेश मयुर जोशी यांनी तयार केले. या पुस्तकाचे संपादन मांडणी आखणी पत्रकार महेश मधुकर जोशी, निर्मीती अहमदनगरच्या क्रिएटीव्ह कम्युनिकेशनचे जयंत पांडुरंग देशपांडे यांनी केली.

स्व. शंकरराव कोल्हे ९३ वर्षाचे होते. ७२ वर्षे आयुर्मानापैकी निम्म्याहून अधिक काळ कोपरगांवसह संजीवनी विकासासाठी प्रवासात खर्ची पडले. प्रवासा दरम्यान बाजारात कुठलेही नविन पुस्तक येवो ते त्यांच्या वाहनात हमखास असायचे त्याचे मन लावून वाचन करून टिप्पणं काढणं हा त्यांचा छंद होता. वाचन संस्कृतीतुन त्यांनी स्वतःला घडविले, तोलामोलाचे कार्यकर्ते तयार करून त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात थेट सहभागी झाले आणि तीच त्यांची उर्जा होती. वयाच्या ९३ व्या वर्षापर्यंतही ते शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले.

सत्याग्रही शेतकरी या नावांने त्यांचे आत्मचरित्र २०१२ मध्ये प्रसिध्द झाले त्यानंतर २०१३ मध्ये छान सुविचार पुस्तक निर्मीती उपक्रमाची वीरेंद्र जोशी यांनी शंकरराव कोल्हे यांना माहिती देवुन त्यासाठी प्रयत्न केले मात्र हा प्रकल्प स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त साकारला गेला.

या पुस्तकात सुविचाराबरोबरच स्व. शंकरराव कोल्हे यांचा संपुर्ण जीवनपट त्यांच्या कारकिर्दीनुरूप उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण संजीवनीची उभारणी, मंत्रीपद शपथ, पंतप्रधान चंद्रशेखर, तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अमृतमहोत्सवी विधीमंडळ, सहकार शताब्दीत संगणकाच्या सहाय्याने झालेली प्रगती त्यावरील मार्गदर्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडुन गौरव आणि मॉरिशियस साखर संशोधन संस्था परदेश प्रवास भेट या छायाचित्रांचा समावेश आहे. आज समाज माध्यमे जरी प्रगत होत असली तरी लिखित पुस्तक ज्ञानप्रसाराच्या उद्देशाने वीरेंद्र जोशी यांनी छान सुविचार पुस्तक निर्मितीत परिश्रम घेतले.