श्रीगणेश प्रज्ञाशोधपरीक्षा रविवारी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ :  कोऱ्हाळे येथील श्रीगणेश कनिष्ठ  महाविद्यालयाच्या वतीने ईयत्ता १० वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी  श्रीगणेश टॅलेंट सर्च परीक्षा रविवारी (ता.२६ मार्च ) ऑफलाइन घेण्यात येणार आहे. सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत संपन्न होणाऱ्या या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही. 

तसेच या परीक्षेत सहभागी होणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यास व पालकास करीअर मार्गदर्शन संबधी विविध पर्याय या विषयावर तज्ञ मंडळींमार्फत मार्फत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी  दिली आहे.         

   ते म्हणाले कि ,सदर परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्णतः १० वीचा असून ५० प्रश्न बहुपर्यायी १०० गुणांसाठी विचारले जाणार आहे. त्यामध्ये सायन्स २५ प्रश्न ,गणित १५ प्रश्न ,गणित बुध्दीमत्ता १० प्रश्न अशी विभागणी केलेली आहे. परीक्षेचा कालावधी १ तास राहील.

या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सात हजार, व्दितीय क्रमांकासाठी पाच हजार, तृतीय  क्रमांकासाठी तीन हजार व उत्तेजनार्थ एक हजाराची (५ बक्षिसे), सातशेची (२० बक्षिसे), पाचशेची (२५ बक्षिसे) अशी एकूण ५३ बक्षिसे ठेवण्यात आली आहे. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा  असे आवाहन करण्यात आले आहे.