कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : कोपरगाव शहरातील शांताबाई लोंढे कोपरगावकर या जेष्ठ लावणी सम्राज्ञी लोककलावंत यांची वृद्धापकाळातील व्यथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे व माध्यमांनी आवाज उठविला त्यानंतर समोर आली होती. तात्काळ शांताबाई यांना हक्काचा निवारा आणि त्यांचं उघड्यावरच जीवन मायेचं छत देऊन सुखी व्हावे यासाठी कोल्हे यांनी पुढाकार घेतला होता. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ५ लाख रुपये मदत देण्यात आली.
शांताबाई यांची व्यथा दूर करण्यासाठी शिर्डी येथील द्वारकामाई वृध्दाश्रम येथे स्नेहलता कोल्हे यांनी दाखल करून त्यांची व्यवस्था केली, असल्याच्या बातम्यांची व त्यांना मदत व्हावी या मागणीची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दखल घेतली असून शासन आपल्या दारी या काकडी येथील कार्यक्रम प्रसंगी शांताबाई यांना 5 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता विभागाने दिला आहे. यावेळी शांताबाई कोपरगावकर यांना मुख्यमंत्र्यांच्या व उपमुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी समवेत स्नेहलता कोल्हे होत्या.
शांताबाई लोंढे यांच्या सारख्या एक काळी नावाजलेल्या दुर्लक्षित कलावंताची दखल घेऊन त्यांना मोठी मदत मिळवून दिल्याबद्दल स्नेहलता कोल्हे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोणत्याही कामाचा पाठपुरावा आणि त्यातून सर्वसामान्य गोर गरीबांचे जीवन सुखकर होण्यासाठी लढण्याचा स्नेहलता कोल्हे यांचा लढाऊ बाणा कोपरगावकरांची मान उंचावणारा आहे.
लावणी सम्राज्ञी शांताबाई लोंढे कोपरगावकर यांच्या जीवनाची हेळसांड होऊ नये यासाठी कोल्हे यांच्या समवेत अनेक सामाजिक संघटना, प्रसार माध्यमे, सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील आवाज उठवला त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम काकडी येथे पार पडला. या प्रसंगी शांताबाई यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. दीपक केसरकर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा.सदाशिव लोखंडे, खा.सुजय विखे, कोल्हे कारखाना चेअरमन विवेक कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी आमदार,विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शांताबाई कोपरगावकर यांना मिळालेली मदत ही मला आत्मिक समाधान देणारी आहे. एका लोक कलावंताला मिळालेला न्याय ही माझ्यासाठी खरी प्रेरणा असून कुणाही गोर गरीब वंचित व्यक्तीला आधार देने व त्याचे चीज होणे याला मी खरी संपत्ती मानते व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त करते- स्नेहलता कोल्हे