आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोलाचे – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करून प्रत्यक्षात ते बदल घडवून आाणले. त्यामुळे आज प्रगतिशील भारत देश प्रत्यक्ष स्वरूपात दिसत असून आधुनिक भारताच्या या जडणघडणीत महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी त्यांच्या अलौकिक बुद्धीच्या व ज्ञानाच्या जोरावर अनेक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांचे मोलाचे कार्य म्हणजे देशाच्या मध्यवर्ती ‘रिझर्व बँके’ ची स्थापना असून वीज निर्मिती आणि जलसिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी देशातील पहिला नदी-खोरे प्रकल्प तयार केला.

जलनिती बरोबरच कामगार कल्याणाचे कायदे, औद्योगिकीकरण आणि त्यातून साधला जाऊ शकणारा देशाचा विकास यासाठी त्यानी अनेक योजना तयार केल्या. तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्व शक्तिनिशी जागा करून आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून देवून हक्काने जगण्याचे शिकवले. त्यासाठी संघर्षाचे सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी म्हटले आहे.

यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, सामाजिक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष सुनील मोकळ, शहराध्यक्ष प्रकाश दुशिंग, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, दिनकर खरे, कृष्णा आढाव,राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, 

डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, विजय त्रिभुवन, शंकरराव घोडेराव, बाळासाहेब रुईकर, संदीप कपिले, अॅड.मनोज कडू, आकाश डागा, इम्तियाज अत्तार, राजेंद्र खैरनार, डॉ. राजेंद्र रोकडे, दिनेश पवार, बाळासाहेब शिंदे, शैलेश साबळे, विकास बेंद्रे, बापू वढणे, मनोज नरोडे, सचिन गवारे, ऋषिकेश खैरनार,योगेश वाणी, शिवाजीराव कुऱ्हाडे, भाऊसाहेब भाबड, चांदभाई पठाण, संतोष शेजवळ,

मुकुंद इंगळे, विशाल राऊत, महेश उदावंत, गणेश बोरुडे, राकेश धाकतोडे, मनोज शिंदे, संजय दुशिंग, राजेंद्र आभाळे, नितीन शिंदे, राजेंद्र उशिरे, शिवाजी लकारे, किरण बागुल, राकेश शहा, बाळासाहेब सोनटक्के, निलेश रुईकर, बाबुराव पवार, प्रविण शेलार, शिवाजी कुऱ्हाडे, जय बोरा, गिरीश हिवाळे, कैलास साळवे, संदीप वाघ, राकेश धाकतोडे, सुनील सातदिवे, आकाश गायकवाड, राणीताई बोर्डे, सविताताई भोसले आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.