शेवगावात अवकाळी पाऊस

शेवगाव प्रतिनिधी, दि . २८ :    आज शुक्रवारी (दि . २८ )  सकाळी शेवगाव शहरासह तालुक्यातील बक्तरपूर , दादेगाव, जोहरापूर सालवाडगाव, खरडगाव, आखेगावआदि गावाना अवकाळी पावसाने झोडपून काढले. यावेळी वादळ वाऱ्यासह बारीक गारपीट झाली. शेवगावात अवघ्या अर्धा तास झालेल्या पावसाने शहरात अनेक रस्ते पाण्याखाली बुडाले. पंचायत समिती रस्त्यावर, लोकमान्य हॉस्पिटल समोर तसेच गाडगे बाबा चौकात राज्य मार्गावर मोठी डबकी साचल्याने रुग्णांचे, प्रवाशांचे, मोठे हाल झाले.

    तालुक्यातील खरडगाव परिसरात झालेल्या गारपिटीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसला . कित्येकाच्या शेतात काढून पडलेला कांदा पावसाच्या पाण्यावर तरंगला .   अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगली धांदल उडाली.