सालवडगावच्या उपसरपंचपदी राजेंद्र औटी  बिनविरोध

शेवगाव प्रतिनिधी, दि . २८ : तालुक्यातील सालवडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच राजेंद्र बाबुराव औटी यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदासाठी सरपंच आण्णासाहेब रुईकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

     मागील उपसरपंचांनी  राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.उपसरपंचपदासाठी राजेंद्र बाबुराव औटी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण  निक्ते, सुनिता  औटी, यमुना भापकर,भारत  लांडे सदस्य उपस्थितीत होते.ग्रामसेवक प्रफुल्ल राऊत यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

       सोसायटीचे व्हा. चेअरमन काशिनाथ रुईकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच औटी यांचा सन्मान केला. याप्रसंगी पत्रकार रामनाथ रुईकर, चंद्रनाथ औटी, योगेश  विर,बाळासाहेब लांडे, बाळासाहेब कमानदार, सुरेश रुईकर उपस्थित होते.