कोरगाव प्रतिनिधी, दि. २६ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवून मागील साडे तीन वर्षांत ११०० कोटीपेक्षा जास्त निधी मतदार संघाच्या विकासासाठी आणला आहे. या निधीतून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साकारतांना करण्यात आलेली विकासकामे दीर्घकाळ टिकली पाहिजे यासाठी गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे २० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या जी.प. शाळा ते महालखेडा काळधोंडी नदी ते तालुका हद्द रस्त्याचे डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन व ९.७५ लक्ष रुपये निधीतून फिजिकल फिटनेस रिक्रिएशन संकल्पनेवर आधारित क्रिडा साहित्याचा लोकार्पण सोहळा नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मतदार संघाच्या विकासाला चालना देवून केलेल्या विकासकामांचा नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी ही विकासकामे दर्जेदार होवून दीर्घकाळ टिकणे गरजेचे आहे.त्यामुळे विकासकामांच्या गुणवत्तेला जास्तीत जास्त प्राधान्य दिले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब कदम, अशोकराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल कदम, शरदचंद्र पवार पतसंस्थेचे संचालक महेंद्र काळे, गणेश घायतडकर, तान्हाजी कदम, सुदाम भुसे, साहेबराव कदम, एकनाथ कदम, संजय काळे, सर्जेराव घायतडकर, उत्तम भुसे, विठ्ठलराव कंक्राळे, काकासाहेब लामखडे, प्रल्हाद वाघ, सुरेश कंक्राळे, हर्षद धुळे, प्रविण आहेर, भानुदास कदम, बाळासाहेब घायतडकर, तुळशीराम दवंगे, विश्वनाथ भुसे, तुकाराम कदम, सुनील काळे,
गोरख दवंगे, दीपक राशीनकर, उत्तम सोनवणे, बाळासाहेब आहेर, पुंजाराम पवार, बाळासाहेब लामखडे, पार्थ कदम, पंढरीनाथ काळे, सोमनाथ घायतडकर, माधवराव कदम, सुभाष कदम, धर्मा भुसे, संदीप पवार, वाल्मिक घायतडकर, अशोक कंक्राळे, पोपट वाकचौरे, कैलास मोरे, काशिनाथ कंक्राळे, संदीप कंक्राळे, सुधाकर घायतडकर, संजय कदम, मालोजी कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.