कोपरगांव प्रतिनिधी, दि. १२ : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कोपरगांव शहरातील आयेशा कॉलनी सह ग्रामिण भागातील सुमारे ३८ मुस्लीम बांधव पत्नीसह पवित्र मक्का मदिना हज यात्रेस रवाना होत असल्याबद्दल त्यांचे स्वागत केले आहे.
प्रारंभी फकिर महंमद पहिलवान यांनी उपस्थित सर्व हाजी यात्रेकरूचे स्वागत केले. खालीकभाई कुरेशी यांनी प्रास्तविक केले. गेल्या २५ वर्षापासुन हज यात्रेकरूंना आवश्यक कागदपत्रांसह मार्गदर्शन देण्यांचे काम हाजी रियाज शेख सर करत असुन त्यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला.
बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, महंमद पैगंबर आणि पवित्र हज यात्रा एकमेकांचा अतूट संबंध आहे. इस्लामी परंपरेनुसार इब्राहिमने अल्लाह परमेश्वराच्या सुचनेवरून काबा म्हणजेच परमेश्वराचे घर बनविले तेंव्हापासूनचा हा इतिहास पुर्वपार चालत आलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व सर्व मंत्रीमंडळाने हज यात्रा प्रवास सुखकर करण्यासाठी सातत्याने योगदान दिलेले आहे. यावर्षी देशभरातुन सुमारे दीड लाख मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी जात आहे. त्यात आपल्या कोपरगांव शहरातील आयेशा कॉलनीसह ग्रामिण भागातील मौलाना असिप, यांच्यासह सर्व ३८ मुस्लीम बांधव पत्नीसह मक्का मदिना पवित्र हाज यात्रेत सामिल झाले हा क्षण सर्वांसाठी संस्मरणीय आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी मुस्लीम बांधवांना वेळोवेळी सहकार्य केलेले आहे.
याप्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, पराग संधान, महेंद्र काले, दत्ता काले, साहेबराव रोहोम, राजेंद्र सोनवणे, रविंद्र पाठक, मौलाना रहेमानी पठाण, विनोद राक्षे, कैलास जाधव, बबलु वाणी, आदींनी उपस्थित राहुन हज यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. शेवटी मनोज नरोडे यांनी आभार मानले.