आदर्श शाळांना तालुका स्तरावर पारितोषिके – तृप्ती कोलते

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने सध्या सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनांच्या इयत्ता १२वी पर्यंतच्या शाळा करिता ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्याची प्रक्रीया सुरु झाली असून शेवगाव तालुक्यातील २२६ जिल्हा परिषद प्राथमिक शाळापैकी १८० शाळाची तसेच ७३ माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांपैकी आज अखेर ३५ माध्यमिक शाळांची अभियानात सहभागी होण्याची नोंदणी झाली असून उर्वरित शाळानी या महत्वाकांक्षी अभियानात त्वरित सहभागी व्हावे असे आवाहन गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी केले आहे.

Mypage

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या तालुका स्तरीय नोंदणी आढावा बैठकीत गटशिक्षणाधिकारी कोलते बोलत होत्या. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व माध्यमाच्या शाळामधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात आपल्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्याना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे.

tml> Mypage

यासाठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजने अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसीत करण्या बरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासनास, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे तसेच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्व पटवून देणे.

Mypage

त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडण घडण करून विद्यार्थ्यास क्रीडा आरोग्य व व्यक्तीगत व परिसर स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे ही अभियानाची उद्दीष्टे आहेत. शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेचे अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता याबाबी विचारात घेऊन तालुका स्तरावरील मुल्याकंन  समिती पहाणी करून आदर्श शाळांना तालुका स्तरावर प्रथम-तिन लाख, द्वितीय दोन, तर तृतिय एक लाख रुपये तर जिल्हा व विभागिय स्तरावर  यापेक्षाही अधिक रक्कमेची पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी कोलते यांनी यावेळी दिली. 

Mypage