महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गट चळवळ महत्वाची – नितीनराव औताडे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : ग्रामीण भागातील महिलांनी चुल आणि मुल या जोखडातून बाहेर येत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महिला बचत गट चळवळ उभी केली. महाराष्ट्रात या चळवळीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी एकत्रित येऊन छोट्या मोठ्या लघु उद्योगांची निर्मिती करून महिलांना स्व व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली या संधीचे सोने करत अनेक महिलांनी आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष साधला आहे.

Mypage

त्याप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांनी सुद्धा एकत्रित येऊन वर्धिनी अंतर्गत बचत गटाची स्थापना करून राष्ट्रीयकृत बँकेचे विविध योजनेतून मिळणारे कर्ज घेऊन मसाले, पनीर, पापड, अन्न प्रक्रिया इत्यादी सारखे लघु व्यवसाय सुरु करून स्वता सक्षम झाले पाहिजे. महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण होण्यासाठी बचत गट चळवळ महत्वाची आहे असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते नितीनराव औताडे यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचाय व इंडियन ओवरसीज बँक शाखा पोहेगाव याचे सयुक्त विद्यमाने  महिला स्वयं सहाय्यता समुह कर्ज वाटप मेळाव्यात बोलत होते.

Mypage

याप्रसंगी इंडियन ओवरसीज बँक पोहेगाव शाखेचे वतीने काळूबाई महिला स्वयं सहाय्यता समुह, देर्डे चांदवड यांना रक्कम रु.५.०० लाख, मंथन महिला स्वयं सहाय्यता समुह, पोहेगाव यांना रक्कम रु.५.०० लाख, कुलस्वामिनी महिला स्वयं सहाय्यता समुह, पोहेगाव यांना रक्कम रु.५.०० लाख, सावित्री महिला स्वयं सहाय्यता समुह, पोहेगाव यांना रक्कम रु.५.०० लाख, मयुरेश्वर महिला स्वयं सहाय्यता समुह, देर्डे कोऱ्हाळे यांना रक्कम रु.४.०० लाख, लक्ष्मी महिला स्वयं सहाय्यता समुह, पोहेगाव यांना रक्कम रु.४.०० लाख, आराध्या महिला स्वयं सहाय्यता समुह, पोहेगाव यांना रक्कम रु.४.०० लाख, कोहिनूर महिला स्वयं सहाय्यता समुह, शहापुर यांना रक्कम रु.१.८० हजार असे एकुण रक्कम रु.३३ लाख ८० हजार कर्ज वितरण करण्यात आले.

Mypage

यावेळी सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, नितीनराव औताडे, इंडियन ओवरसीज बँक मॅनेजर पी.बी.कोरडे, उप बँक मॅनेजर पराग सर, राहुल बावीस्कर सर, बाबासाहेब खंडीझोड बचत गटाचे तालुका समन्वयक गणेश मेहेत्रे, वृंदावन ग्रामसंघ पोहेगावचे अध्यक्ष गायत्री औताडे, कावेरी जाधव, संचिती थोरात, मनिषा ब्राम्हणे, शोभा देशमुख, मंजुळा वाघमारे, रेखा डंक, सुरेखा डांगे आदिसंह शेकडोंचे संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक बँक मॅनेजर पी.बी.कोरडे यांनी सूत्रसंचालन पराग सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सरपंच अमोल औताडे यांनी मानले.

Mypage

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *