काळे महाविद्यालयात नवमतदार नोंदणी व युवा संवाद कार्यक्रम संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण मंडळ व तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदार नोंदणी व युवा संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी नायब तहसिलदार आशिष खोमणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, मतदान हा आपला महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक नवमतदार विद्यार्थ्यांनी प्राध्यान्याने करून मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्विकारली आणि आपण ही लोकशाही पध्दती अजूनही टिकवून ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांच्यासाठी ही कार्यशाळा फलदायी ठरेल, असे मत व्यक्त केले. यावेळी कोळपेवाडी येथील तलाठी गोविंद खैरनार उपस्थित होते. 

कार्यशाळा यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सिकंदर शेख, प्रा. खरात एस.आर, प्रा. डॉ. शिंदे, एस.ए. इतर प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. सागर मोरे, प्रा. डॉ. हरिभाऊ बोरुडे यांनी केले. प्रा. सिकदर शेख यांनी आभार मानले.