कोल्हे यांच्या प्रयत्नातुन कोपरगांव – धामोरी बससेवा सुरू

Mypage

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १३ : तालुक्यातील धामोरी, रवंदे, सांगवीभूसार, मायगांवदेवी येथील शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलींसाठी सायंकाळी कोपरगांव आगारातुन बससेवा नसल्यामुळे घरी येण्यासाठी या मुलींची अडचण होत असल्याने त्यावर कोपरगांव आगार व्यवस्थापकाकडे तत्कालीन आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी पाठपुरावा करून बससेवा सुरू केल्याबददल ग्रामस्थ व प्रवाशांनी त्यांचे आभार व्यक्त करून पहिल्या बसचे चालक दिगंबर आढाव व वाहक सागर कासार यांचा सत्कार केला अशी माहिती सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलासराव माळी यांनी दिली.

Mypage

     माळी पुढे म्हणाले की, ग्रामिण भागातुन शहरात शिक्षण घेणा-या मुला मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हलाखीच्या आर्थीक परिस्थितीमुळे प्रत्येकाला स्वतंत्र वाहन उपलब्ध होवु शकत नाही. रवंदे, धामोरी, सांगवीभुसार, मायगांवदेवी आदि ठिकाणाहून कोपरगांव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणा-या मुलींना घरी येण्यासाठी कोपरगांव येथुन एस टी महामंडळाच्या स्वतंत्र बसची व्यवस्था नव्हती त्यामुळे प्रत्येक विद्यार्थीनीस उशीर होत होता. ही अडचण सौ. स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यापुढे सर्व पालकांनी मांडली त्यावर त्यांनी कोपरगांव आगारप्रमुखांशी संपर्क साधुन पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नातुन ही बससेवा सुरू झाल्याने ग्रामिण भागातील रहिवासी व प्रवाशांनी त्यांचे विशेष आभार मानले आहे.

tml> Mypage

            याप्रसंगी पोलिस पाटील विजयराव ताजणे, विजय साळुंखे, बाळासाहेब अहिरे, शांताराम गडाख, बाळासाहेब वाघ, सचिनराव माळी, दत्तात्रय पगार, बाबासाहेब जगझाप, पांडुरंग सोमासे, पोपट मोरे, नारायण माळी, संदिप अहिरे, दशरथ भवर, संजय पगार, प्रदिप वाणी, भगवान रौंदाळे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी दशरथ भवर यांनी आभार मानले.

Mypage